Resume Tips : नोकरी होणार पक्की ; धुळ खात पडलेला रिझ्युमला असे करा अपडेट!

नोकरीसाठी अर्ज करताना महत्वाची गोष्ट म्हणजे रिझ्युम.
Resume
ResumeEsakal

Resume: नोकरीसाठी अर्ज करताना महत्वाची गोष्ट म्हणजे रिझ्युम. यामध्ये अर्ज करणाऱ्या व्यक्ती संबंधित सविस्तरपणे माहिती दिलेली असते. याला बायोडाटा असे देखील म्हणतात. रिझ्युममध्ये नाव, नंबर, ईमेल, शिक्षण, अनुभव या महत्वाच्या गोष्टी असतात. त्यामुळे तो आकर्षक असणे गरजेचे आहे.

रिझ्युम बनवून बरेच दिवस झाले तरी तोच रिझ्युम आपण इंटरव्ह्युसाठी नेत असतो. त्यामुळे रिझ्युम अपडेट करणे आवश्यक आहे. चांगला जॉब मिळवणं हे प्रत्येकाच्या आयुष्यातलं एक 'मिशन' असतं. चांगल्या जॉबसाठी तुमचा 'सीव्ही'देखील तितकाच आकर्षक, छाप पाडणारा हवा. त्यासाठीच या काही खास टिप्स आज पाहुयात.

Resume
Job : भारतीय पोराला मानलं राव! 600 मेल्स अन् 80 फोन कॉल्सनंतर अमेरिकेत मिळवली नोकरी

महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या.

1) रिझ्युममध्ये आजवरचा कामाचा अनुभव अपडेट करताना कोणतीही इतर माहीती न देता. ज्या कामासाठी आप्लाय केले आहे. त्यासंदर्भातच माहिती अपडेट करा. 

2) रिझ्युमचा फॉरमॅट 

रिझ्युमचे डिझाईन, फॉन्ट आणि त्यातील कॉलम याकडे खास लक्ष द्या. या तिघांचा समतोल राखून रिझ्युम तयार करा. तसेच, अनुभव लिहीताना स्ट्रीमलाइन,मॅनेज आणि इम्प्रुव्ह हे वर्ब वापरा. 

Resume
Jobs Opportunity : विद्यार्थ्यांना मिळणार रोजगाराची संधी; जाणुन घ्या प्रक्रिया

3) महत्त्वाची कागदपत्रे

रिझ्युमसोबत महत्त्वाची कागदपत्रे जोडा. त्यामुळे कंपनीला तूमच्या आजवरच्या कामाबद्दल रिझ्युम पाहुनच समजेल. तूमच्याच असलेल्या एक्स्ट्रा ऍक्टीव्हीटीज लिहायला विसरू नका. 

4) 'अचिव्हमेण्टस'

तुमच्या 'अचिव्हमेण्टस'ना 'सीव्ही'त चांगले स्थान मिळायला हवे. त्या 'अचिव्हमेण्ट'स तुम्ही कशा मिळवल्या याची अगदी थोडक्यात 'टू द पॉइंट' माहिती त्यात असू दे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com