Job : भारतीय पोराला मानलं राव! 600 मेल्स अन् 80 फोन कॉल्सनंतर अमेरिकेत मिळवली नोकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Job : भारतीय पोराला मानलं राव! 600 मेल्स अन् 80 फोन कॉल्सनंतर अमेरिकेत मिळवली नोकरी

Job : भारतीय पोराला मानलं राव! 600 मेल्स अन् 80 फोन कॉल्सनंतर अमेरिकेत मिळवली नोकरी

अनेकांच्या संघर्षाबद्दल तुम्ही बघितले अथवा ऐकले असेल. अनेकजणांना प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेकदा पाहिलेली स्वप्ने अर्ध्यावर सोडावी लागतात. मात्र, अशा व्यक्ती हार पत्कारत नाही. जगात अशी अनेक लोकं आहेत ज्यांना काही कारणास्तव त्यांची स्वप्ने अर्ध्यावर सोडावी लागली आहे. परंतु, याच व्यक्तींनी नवा इतिहास रचल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशीच काहीशी घटना समोर आली आहेत. स्वप्नातील नोकरी मिळवण्यासाठी या पोरानं चक्क 60 मेल्स आणि 80 फोन कॉल्स केले. वत्सल नाहाटा नावाच्या या पोराची ही घटना लिंकडिन या प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाली आहे.

हेही वाचा: Pind Dan at Raigad : रायगडावर पिंडदान करण्यात गैर काय? शिवभक्त संतापले!

अमेरिकेतील येल युनिव्हर्सिटीत शिकलेल्या वत्सलने आपले ध्येय साध्य करण्यासाठी खूप मेहनत घेतली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वप्नातील नोकरी मिळवण्यासाठी त्याला 600 ईमेल्स आणि 80 कॉल्समधून जावे लागले. कठोर परिश्रम आणि ध्येय निश्चित असेल तर, उद्भवणारी कोणतीही अडचण मोठी नसते हे वत्सलने दाखवून दिले आहे.

वत्सल अमेरिकेतील येल विद्यापीठात शिकत होता. त्यावेळी अमेरिकेत महामारी होती आणि नोकऱ्यांची खूप कमतरता होती. महामारीच्या काळात अनेक कंपन्या त्यांच्या कर्मचार्‍यांना काढून टाकत होत्या. तसेच केवळ अमेरिकेतील लोकांनाच नोकऱ्या दिल्या जातील असे विधान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते. त्यामुळे वत्सलपुढे प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, या परिस्थित हार न मानता जागतिक बँकेत नोकरी मिळवायचीच असा निर्धार त्याने केला.

हेही वाचा: Employee : जा जी ले अपनी जिंदगी! ई-कॉमर्स कंपनीची कर्मचाऱ्यांसाठी खास घोषणा

बँकेतील नोकरीसाठी वत्सने थोडे थोडके नव्हे तर, तब्बल 600 ईमेल आणि 80 कॉल केले. मात्र,, प्रत्येकवेळी त्याला नकाराचा सामना करावा लागला. अखेर त्याने केलेल्या प्रयत्नांना यश आले आणि वत्सला त्याला हवी असलेली नोकरी मिळवण्यात यश आले. वत्सल सध्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये (IMF) काम करत असून, नोकरी मिळवता आणि नोकरीदरम्यान अनेक गोष्टी शिकता आल्याचं तो सांगतो. तसेच आयुष्यात येणाऱ्या अडचणींमध्ये कधीच प्रयत्न थांबवू नये असा मोलाचा सल्ला त्याने तरूणांना दिला आहे. वत्सलच्या या प्रयत्नांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असून, थोड्या अडचणींमुळे हार मानणाऱ्या लोकांसाठी वत्सल सध्या आयकॉन ठरत आहे.