
नवीन ग्राहकांपर्यंत ऑनलाइन पोहोचण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे आणि म्हणूनच त्याला ‘ऑनलाइन मार्केटिंग’ म्हणतात. डिजिटल माध्यम हे आता माध्यम राहिलेले नाही, तर व्यवसाय करण्याचा एक मार्ग आहे.
सध्याच्या काळात सर्वांत जास्त आणि वेगाने वाढणारे करिअर क्षेत्र म्हणजे डिजिटल मार्केटिंग. डिजिटल मार्केटिंग म्हणजे माध्यम, इंटरनेट आणि डिजिटल मीडियाचा वापर करून आपली उत्पादने आणि सेवांचे मार्केटिंग करणे. डिजिटल मार्केटिंगद्वारे आपण कोणत्याही उत्पादनाला किंवा सेवेला ऑनलाइन प्रोमोट किंवा विक्री करू शकतो. यामध्ये इंटरनेट अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. नवीन ग्राहकांपर्यंत ऑनलाइन पोहोचण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे आणि म्हणूनच त्याला ‘ऑनलाइन मार्केटिंग’ म्हणतात. डिजिटल माध्यम हे आता माध्यम राहिलेले नाही, तर व्यवसाय करण्याचा एक मार्ग आहे.
डिजिटल मार्केटिंग हा प्रमोशन आणि मार्केटिंगचा सर्वांत वेगवान मार्ग म्हणून उदयास आला आहे आणि व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचला आहे. एका अहवालानुसार, ८५ टक्के विक्रेते डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मागोवा घेत आहेत आणि त्यापैकी ५० टक्के विक्रेत्यांनी सांगितले की, ई-मार्केटिंग उपक्रम त्यांच्या महसुलाच्या १० टक्क्यांहून अधिक योगदान देत आहेत. डिजिटल मार्केटिंग व्यापक क्षेत्र असल्याने पात्रता वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी असू शकते. सहसा मार्केटिंग, अॅनालिटिक्स किंवा संबंधित क्षेत्रातील पदवी डिजिटल मार्केटिंग उद्योगात प्रवेश करण्याचे साधन असू शकते. डिजिटल मार्केटिंग हा कमी खर्चाच्या आणि टाइम सेव्हिंग मार्केटिंगचा स्रोत आहे, जो व्यवसाय वाढवण्यास मदत करू शकतो. हा आधुनिकतेचा अनोखा पाठपुरावा आहे. त्यामुळे त्याचा चांगला वापर करा आणि त्याची प्रभावीपणे आणि नैतिकतेने अंमलबजावणी करा.
संधी नोकरीच्या...: विश्व क्लाऊड कॉम्प्युटिंगचे
डिजिटल मार्केटिंगमध्ये नोकऱ्या
१) Digital Marketing Manager
२) SEO Specialist
३) Search Engine Marketer
४) Social Media Marketer
५) Web Analyst/Data Analyst
६) Content Marketer
७) Inbound Marketer
८) Email Marketer
डिजिटल मार्केटिंग मधील करिअर मार्ग
ग्रॅज्युएशन (कोणतेही स्पेशलायझेशन) → डिजिटल मार्केटिंगमध्ये ऑनलाइन प्रमाणपत्र मिळवा → मोफत लर्निंग रिसोर्सेससाठी ब्लॉगचे सदस्यत्व घ्या → वेबसाइट किंवा → ब्लॉग सुरू करा → नोकरी शोधा किंवा स्वतंत्र सल्लागार म्हणून काम करा.
टीप : तुम्ही मार्केटिंग पार्श्वभूमीचे नसलात, तरी तुम्ही काही प्रमाणपत्रे, ऑनलाइन कोर्सेस आणि ऑन जॉब स्किल ट्रेनिंगच्या मदतीने डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात करिअर करू शकता.