एमपीएसीत माणमधील दोघांचा डंका

रोहित कट्टे, मुकेश सजगणे राज्यात प्रथम
Rohit Katte, Mukesh Sajagane
Rohit Katte, Mukesh SajaganeSakal

गोंदवले - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या सहाय्यक कार्यकारी अभियंता परीक्षेत रोहित शिवाजीराव कट्टे याने राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे. त्याच्या या यशाने गोंदवल्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. दरम्यान, विरकरवाडी (म्हसवड) येथील मुकेश अंकुश सजगणे याची एनटी-सी प्रवर्गात गटविकास अधिकारी वर्ग दोन या पदावर राज्यात प्रथम क्रमांकाने निवड झाली आहे. यानिमित्ताने स्पर्धा परीक्षेत यंदाही माणचा डंका दिसून आला आहे.

रोहितचे प्राथमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कुल लांडेवाडी (जि. पुणे) येथे झाले. त्यानंतर दहावीपर्यंतचे शिक्षणही त्याने याच शाळेतून पूर्ण केले. त्यानंतर बारावीनंतर बी ई सिव्हिलपर्यंत शिक्षण घेतले. त्यापुढे एम टेकचे शिक्षण नागपूर येथून पूर्ण केले.त्यानंतर एक वर्ष नोकरी करून दिल्ली येथे मेड इझी या शिक्षण संस्थेत सप्रधा परीक्षेच्या अभ्यासाच्या सरावासाठी क्लास लावला. २०१९ ला या परीक्षेत उत्तीर्ण होऊन सहाय्यक अभियंता पद मिळाले. त्यानंतर पुन्हा २०२० च्या परीक्षेत सार्वजनिक बांधकाम विभागातील सहाय्यक कार्यकारी अभियंता परीक्षेत त्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला.या यशाने माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.या यशाबद्दल ग्रामस्थांनी जल्लोष करीत अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com