
UNACADEMY Success Story : सामान्यपणे एखादी व्यक्ती एका क्षेत्रात यशस्वी झाली तरी तीच गोष्ट जीवनभर करत राहते. मात्र काही व्यक्ती अशा असतात ज्या सतत काहीतरी वेगळं करण्याचा ध्यास घेतात. अशाच व्यक्तींपैकी एक म्हणजे रोमन सैनी. अवघ्या १६व्या वर्षी डॉक्टर, २२व्या वर्षी IAS अधिकारी आणि आज २६ हजार कोटींच्या 'Unacademy' या शैक्षणिक स्टार्टअपचे सहसंस्थापक! त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाने लाखो तरुणांना नवा दृष्टिकोन दिला, तसेच डिजिटल क्रांतीच्या वाटचालीत एक पाऊल पुढे टाकले.