

RRC Mumbai Apprentices 2026
sakal
रेल्वेमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे भर्ती सेल (RRC), मुंबई अंतर्गत अप्रेंटिसशिपच्या एकूण २८६१ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीद्वारे विविध ट्रेडमध्ये उमेदवारांना प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २ डिसेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.