विशेष : स्थापत्य अभियंत्यासाठी शासकीय क्षेत्रातील संधी | Engineer | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विशेष : स्थापत्य अभियंत्यासाठी शासकीय क्षेत्रातील संधी
विशेष : स्थापत्य अभियंत्यासाठी शासकीय क्षेत्रातील संधी

विशेष : स्थापत्य अभियंत्यासाठी शासकीय क्षेत्रातील संधी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- प्रा. सागर चव्हाण

आजच्या आधुनिक जगात स्थापत्य अभियांत्रिकी व स्थापत्य अभियंता यांची एक वेगळीच ओळख आहे. स्थापत्य अभियंत्याला खासगी क्षेत्रात प्रचंड मागणी आहेच, शिवाय शासकीय क्षेत्रात देखील भरपूर संधी उपलब्ध आहेत. स्थापत्य अभियंत्याला शासकीय क्षेत्रात कोणत्या संधी उपलब्ध आहेत ते आज जाणून घेऊया...

1) सार्वजनिक बांधकाम विभाग

सार्वजनिक बांधकाम विभागात स्थापत्य अभियंत्यासाठी कनिष्ठ अभियंता किंवा सहायक कनिष्ठ अभियंता या पदासाठी भरती होत असते. शासकीय इमारती बांधकामे, व्यवस्थापन या कामासाठी त्यांची आवश्यकता असते.

2) जिल्हा परिषद

प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी स्थापत्य अभियंत्याची भरती जिल्हा परिषद मार्फत केली जाते. या ठिकाणी सहायक कनिष्ठ अभियंता म्हणून स्थापत्य अभियंत्याची नेमणूक केली जाते.

3) जलसंपदा विभाग

जलसंपदा विभागाअंतर्गत बऱ्याच संधी स्थापत्य अभियंत्याला असतात. कनिष्ठ अभियंता व सहायक अभियंता म्हणून स्थापत्य अभियंता यांची या विभागात नेमणूक करण्यात येत असते.

4) जलसंधारण विभाग

जलसंधारणाची बांधकामे, तपासणी व व्यवस्थापन याकरिता जलसंधारण विभागात स्थापत्य अभियंता यांची कनिष्ठ स्थापत्य अभियंता या पदावर नेमणूक करण्यात येते.

5) भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत रस्ते बांधकाम, दुरुस्ती व व्यवस्थापनाचे कामे करण्यासाठी सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंता म्हणून स्थापत्य अभियंता यांची नेमणूक करण्यात येते.

6) भूमी अभिलेख विभाग ( Land Records Department)

शासकीय कामातील क्षेत्राची मोजणी करणे, क्षेत्राची विभागणी करणे इत्यादी कामांसाठी स्थापत्य अभियंत्याची सर्व्हेअर म्हणून भूमी अभिलेख विभागात नेमणूक करण्यात येते.

7) भारतीय विमानतळ प्राधिकरण (NHAI)

विमानतळावरील सुविधा, जसे की बांधकाम, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन व शुद्धीकरण अशा अनेक कामांसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत स्थापत्य अभियंत्याची नेमणूक केली जाते.

8) नगर रचनाकार ( Town Planner)

शहरी भागाचा विकास व नागरिकांच्या गरजेनुसार सोयी पुरविण्यासाठी नगर रचनाकार या पदासाठी स्थापत्य अभियंता यांची नेमणूक करण्यात येते.

9) महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA)

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अंतर्गत पुनर्वसन व विकासाची कामे, इमारती बांधकाम व दुरुस्ती या कामांसाठी स्थापत्य अभियंता यांची कनिष्ठ स्थापत्य अभियंता म्हणून नेमणूक करण्यात येते.

इतर शासकीय क्षेत्रातील संधी

  • पाणी पुरवठा विभाग

  • रक्षा अनुसंधान आणि विकास संघटन (DRDO)

  • भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)

  • शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (CIDCO)

  • रेल्वे विभाग

  • कर्मचारी निवड आयोग (SSC)

  • महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC)

  • जल व मृदा संधारण विभाग (WCD)

  • राष्ट्रीय शेती व विकास बँक (NABARD)

  • भाभा अनु संशोधन केंद्र (BARC)

loading image
go to top