Sakal Vidya : स्पर्धा परीक्षा व करिअर अभ्यासक्रमाबाबत चिंचवडमध्ये येत्या रविवारी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

अकरावीसाठी पालक-विद्यार्थ्यांनी कोणता निर्णय घ्यावा?
Sakal-Vidya
Sakal-Vidyasakal

पिंपरी - अकरावी, बारावीच्या अभ्यासाबरोबरच सीईटी, जेईई, नीट अशा परीक्षांची तयारी व अभ्यासाचे नियोजन कसे करावे ? येणाऱ्या काळात अभ्यासक्रमात होणारे बदल ? याविषयी पालक चिंताग्रस्त आहेत. दहावीतून अकरावीला जाताना पालकांनी नेमक्या कोणत्या शाखेला पसंती द्यावी, देशभरातील नामांकित संस्था कोणत्या आहेत?

सहावीपासूनच राज्य व राष्‍ट्रीय पातळीवरील परीक्षांची तयारी का व कशी करावी? अशा प्रश्‍नांचे उत्तर तुम्हाला ‘सकाळ विद्या’ आणि ‘एक्‍सिड’च्या (एक्‍सलंट एज्युकेशन) माध्यमातून होणाऱ्या मार्गदर्शन चर्चासत्रातून मिळणार आहे. रविवारी (ता. १२) सकाळी नऊला चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हे चर्चासत्र होणार आहे.

या चर्चासत्रात सहावीपासूनच एनएसओ, आयएमओ, एनटीएसई, होमी भाभा या परीक्षांचे स्वरूप व अभ्यासक्रम, त्यांची तयारी का व कशी करावी? राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धा परीक्षांची तयारी का व कशी करावी? इंजिनिअरिंग, मेडिकल व विज्ञान शाखेतील परीक्षांबाबत मार्गदर्शन मिळणार आहे. सहावी ते दहावीपासूनच तयारीला लागलो तर बारावीमध्ये अभ्यासाचा ताण कसा कमी होऊ शकतो.

सीईटी, जेईई, नीट परीक्षांची तयारी, अभ्यासक्रमाचे नियोजन, बारावीनंतर अभियांत्रिकी व मूलभूत विज्ञान शाखेतील करिअरचे विविध पर्याय आणि त्यातील शिक्षण घेण्यासाठी देशातील नामांकित संस्था आयआयटी, एनआयटी, बीआयटी, व्हीआयटी, आयआयएससी, आयआयएसईआर, एनआयएसईआर व त्यांची प्रवेश प्रक्रिया याबाबतच्या शंकांचे निरसन चर्चासत्रातून होणार आहे.

यामध्ये दहावी, अकरावी, बारावीसह सहावी ते नववीपर्यंतचे विद्यार्थीही सहभागी होऊ शकतात. विद्यार्थी व पालकांच्या करिअर व प्रवेश परीक्षांतील बदलांविषयीच्या सर्व शंका व प्रश्‍नांची उत्तरे या चर्चासत्रातून मिळतील.

काय? - कधी? केव्हा? कुठे?

  • काय? - स्पर्धा परीक्षा व करिअर अभ्यासक्रम तयारी

  • कधी? - रविवारी १२ मे २०२४

  • केव्हा? - सकाळी ९ वाजता

  • कुठे? - प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड

  • प्रवेश - विद्यार्थी व पालकांसाठी विनामूल्य

  • नावनोंदणी निश्चित करण्यासाठी संपर्क करा

  • प्रथम येणाऱ्यास प्राधान्य

  • संपर्क - ८३७८९८७८३६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com