Sakal Vidya Education Expo : शिक्षण, करिअर मार्गदर्शनाची उद्यापासून संधी; ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२४’चे आयोजन

‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२४’ हे शैक्षणिक प्रदर्शन तुमच्यासाठीच आहे. ‘सकाळ’च्या वतीने ८ ते ९ जूनदरम्यान हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
Sakal Vidya Education Expo 2024
Sakal Vidya Education Expo 2024sakal

पिंपरी - तुम्हाला दहावी-बारावीनंतरच्या करिअर संधींची माहिती आहे का? तुम्ही पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या तयारीत आहात का? नेमका कोणता अभ्यासक्रम आणि कोठे करायचा हे ठरलेले नाही का? नामांकित शिक्षण संस्थांमध्ये नवीन कोणते अभ्यासक्रम आहेत? याबद्दल माहिती हवीय का?

अहो, मग ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२४’ हे शैक्षणिक प्रदर्शन तुमच्यासाठीच आहे. ‘सकाळ’च्या वतीने ८ ते ९ जूनदरम्यान हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात तुम्हाला तुमच्या प्रश्‍नांची उत्तरे आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शनदेखील मिळणार आहे.

काळेवाडी येथील संत मदर तेरेसा (एम्पायर इस्टेट) पुलाजवळील रागा पॅलेस येथे हे शैक्षणिक प्रदर्शन होत आहे. शहरातील ३० हून अधिक नामांकित शिक्षण संस्था या प्रदर्शनात सहभागी होत आहेत. त्यामध्ये विविध शैक्षणिक पर्यायांची माहिती देतानाच विद्यार्थी आणि पालकांसाठी तज्ज्ञांची मार्गदर्शनपर चर्चासत्रे होणार आहेत.

दहावी-बारावीनंतर शिक्षणाच्या बहुविध पर्यायाची माहिती, कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषध निर्माणशास्त्र, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, हॉटेल मॅनेजमेंट, इंटेरियर डिझाइन, फॅशन डिझायनिंग, पॅरामेडिकल, आर्किटेक्चर, माहिती तंत्रज्ञान यासह अन्य अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थी-पालकांना प्रदर्शनातून घेता येईल. त्याचबरोबर सीईटीसह अन्य स्पर्धा परीक्षांबाबतही येथे मार्गदर्शन मिळेल.

या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअरच्या १०० हून अधिक संधींची माहिती एकाच छताखाली मिळेल. पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट प्रस्तुत ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२४’ चे मॅट्रिस सायन्स ॲकॅडमी हे प्रायोजक आहेत. तर एमआयटी कॅम्पस, आळंदी हे सहप्रायोजक आहेत. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल.

काय?, केव्हा?, कधी?, कुठे?

  • काय? - सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२४

  • कधी? - शनिवार ता. ८ आणि रविवार ता. ९ जून

  • केव्हा?- सकाळी १० ते रात्री ८

  • कुठे? - रागा पॅलेस, संत मदर तेरेसा (एम्पायर इस्टेट) पुलाजवळ, काळेवाडी

अधिक माहितीसाठी

  • अमोल ८३७८९८७८३६ आणि सचिन ९७३०९५९६९९

कोण आहेत अच्युत गोडबोले?

प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांचे ‘ए.आय : उद्याच्या जगातील बदलते तंत्रज्ञान’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्‍यांनी आय.आय.टी. मुंबईमधून केमिकल इंजिनिअरचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना सॉफ्टवेअर क्षेत्रात भारत, इंग्लंड आणि अमेरिका इथे ३२ वर्षं अनुभव आणि त्यातली २३ वर्षे हजारो सॉफ्टवेअर इंजिनियर्स असलेल्या जगन्मान्य आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी अशा सर्वोच्च पदांचा अनुभव आहे. तंत्रज्ञान - संगणकयुग (संगणक), नॅनोदय (नॅनोटेक्नॉलॉजी), आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय), इन्फोटेक (संगणक आणि अद्ययावत तंत्रज्ञानांची माहिती), डेटा सायन्स (डेटा सायन्स संदर्भातील माहिती), इंडस्ट्री ४.० ते ५.० (इंडस्ट्री ४.० ते ५.० विषयी सर्वकाही), फ्युचरटेक (भविष्यातल्या तंत्रज्ञानांची माहिती), भन्नाट शोध (मानवी जीवन सुकर करणाऱ्या शोधांची कहाणी) अशा विविध ५४ पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे.

शिक्षण संस्थाचालक म्हणतात...

‘सकाळ’च्या विद्या एज्युकेशन एक्स्पो’मध्ये बीएस्सी डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी असे एका ना अधिक अभ्यासक्रमांची माहिती मिळणार आहे. सध्या या अभ्यासक्रमांना बाजारात मोठी मागणी आहे. त्याद्वारे प्लेसमेंट मिळत आहे. अनेकदा चांगले गुण मिळवूनही अभ्यासक्रमाची निवड करताना गोंधळ होतो. नेमकी ज्या क्षेत्रात आवड आहे. त्यामध्ये नैपुण्य मिळविता येण्यासाठी निर्णय घेता येतो. विविध शैक्षणिक संस्था एकाच ठिकाणी एकत्रित येणार असल्यामुळे पाल्यांना पटकन निर्णय घेता येतो. याशिवाय योग्य करिअरची निवड होण्यास मदत होते. या प्रदर्शनातून पाल्यांना व पालकांना योग्य दिशा मिळणार आहे.

- डॉ.बाळासाहेब वाफारे, प्राचार्य, एमआयटी आर्टस, कॉमर्स, सायन्स कॉलेज, आळंदी

दोन दिवसांच्या ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’मध्ये विविध क्षेत्रांतील शैक्षणिक संधींबाबत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन मिळणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून पालक व विद्यार्थ्यांना करियरच्या विविध क्षेत्रांतील संधींबाबत नवीन माहिती उपलब्ध होणार आहे. अधिकाधिक पालक आणि विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक प्रदर्शनाला भेट देणे आवश्‍यक आहे. आता नवीन शैक्षणिक राष्ट्रीय धोरणामुळे शिक्षणाचा पॅटर्न बदलल्यामुळे पाल्यांना नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. नवीन शैक्षणिक धोरण, अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती आणि दहावीनंतरचे उच्च शिक्षण याबाबत, विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन मिळणार आहे.

- रूपा प्रवीण, संचालिका, औद्योगिक शिक्षण मंडळ

‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’ हे जेईई, एनईईटी आणि एमएचटी-सीईटी यासारख्या विविध प्रवेश परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन मिळविण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. येथे तज्ज्ञांची सत्रे आणि कार्यशाळा असतात. त्यामुळे, हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व्यासपीठ आहे.

- अल्गेश पत्रिके, संचालक, मॅट्रिक्स सायन्स ॲकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड

पॅरामेडिकल कोर्स हे वैद्यकीय क्षेत्रांपैकी एक आहे. सध्या ते विकसित होत आहे आणि अशा क्षेत्रात विकसित होत आहे जे सर्वांत प्रभावशाली आहे. या अभ्यासक्रमांमध्ये नर्सिंग, फिजिओथेरपी, प्रथमोपचार, क्ष-किरण तंत्रज्ञान, रेडियोग्राफी यासारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. पॅरामेडिक क्षेत्र नोकरीच्या अनेक संधी प्रदान करते. मोरया शिक्षण संस्थेमध्ये पॅरामेडिकल अभ्‍यासक्रम विनामूल्य आहे. दोन वर्षांचे अभ्यासक्रम आहेत. विशेष म्हणजे मोफत प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रात एकमेव आमची संस्था आहे. पालक आणि विद्यार्थ्यांनी याचा निश्‍चित लाभ घ्यावा.

- डॉ. गणेश अंबिके, संचालक, मोरया शिक्षण संस्था

गेली अनेक वर्षे पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ‘सकाळ’चे आपलेच एक वेगळे स्थान आहे. शहरातील सर्व स्तरांसाठी ‘सकाळ’ प्रामुख्याने काम करत असते. तरुण- तरुणी हे खऱ्या अर्थाने देशाचा पाया आहे आणि हा पाया भक्कम होऊन त्यांना शिक्षण क्षेत्रातील सर्व संधी एका ठिकाणी देण्याचे काम ‘सकाळ’ वृत्तपत्र हे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने करत आहे.

- डॉ.धनंजय वर्णेकर, संस्थापक, केंब्रिज ग्रुप ऑफ स्कूल

साई बालाजी एज्युकेशन सोसायटी ही सर्वोत्तम जागतिक शिक्षण देण्याच्या दिशेने काम करणारी एक दूरदर्शी संस्था आहे. आम्ही ‘सकाळ’च्या सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो या उपक्रमात दरवर्षी सहभागी होत असतो. या शैक्षणिक प्रदर्शनात नामांकित शिक्षण संस्था सहभागी होत आहेत. विविध शैक्षणिक पर्यायांची माहिती व मार्गदर्शन पालकांना मिळते. उच्च शिक्षणाचे पर्याय एकाच छताखाली मिळणार आहेत. विविध अभ्यासक्रमांचे पर्याय आणि त्यावर आधारित मार्गदर्शनपर चर्चासत्रे आहेत.

- प्रा. मनीष मुंदडा, संस्थापक अध्यक्ष, साई बालाजी एज्युकेशन सोसायटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com