सारस्वत बँकेच्या Junior Officer परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पहा Result

सारस्वत सहकारी बँकने कनिष्ठ अधिकारी पदांवरील ऑनलाइन परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.
Saraswat Bank
Saraswat Bankesakal

Saraswat Bank Junior officer Result 2021 : सारस्वत सहकारी बँकने (सारस्वत बँक) कनिष्ठ अधिकारी Junior Officer (विपणन व ऑपरेशन्स, ग्रेड-बी) पदांवरील भरतीसाठीचा ऑनलाइन परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. निकाल सारस्वत बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून या परीक्षेला बसलेले उमेदवार saraswatbank.com या वेबसाइवर जाऊन आपला निकाल तपासू शकतात. वेबसाइटवर मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी उपलब्ध आहे. उमेदवार त्यांच्या रोल नंबर आणि नावानुसार हेही निकाल पाहू शकतात. (Saraswat Bank Junior Officer Examination Results Announced)

निकाल तपासण्यासाठी उमेदवारांनी प्रथम सारस्वत बँकेच्या अधिकृत वेबसाइटला saraswatbank.com भेट द्यावी. त्यानंतर मुख्यपेजवर उपलब्ध असलेल्या करिअर विभागावर क्लिक करुन कनिष्ठ अधिकारी 2021 पदाच्या भरतीच्या लिंकवरही क्लिक करावे. आता एक नवीन पेज ओपन होईल. तद्नंतर मुलाखतीसाठीच्या शॉर्टलिस्टेड उमेदवारांच्या लिंकवर क्लिक करावे. येथे केंद्रानुसार, रोल क्रमांक आणि यशस्वी उमेदवारांच्या नावांची यादी देण्यात आली आहे. उमेदवारांनी ती तपासावी.

दरम्यान, एकूण 150 कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदांवरील भरतीसाठी 3 एप्रिल 2021 रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. एकूण 9,378 उमेदवार परीक्षेला बसले होते. त्यापैकी 443 उमेदवार यशस्वी झाले आहेत. आता या उमेदवारांना मुलाखतीत सहभाग घ्यावा लागेल. कोरोना साथीचा रोग आणि लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर मुलाखतीचे वेळापत्रक निश्चित केले जाणार आहे.

या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज घेण्यात आले होते. अधिकृत वेबसाइटवर अर्ज करण्याची प्रक्रिया 5 मार्च 2021 पासून सुरू होती, तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2021 होती.

Saraswat Bank Junior Officer Examination Results Announced

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com