esakal | NEET PG 2021 : नीट पीजीचे प्रवेश पत्र 'nbe.edu.in' या वेबसाइटवर होणार जाहीर; अशा पहा परीक्षेच्या तारखा..
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

NEET PG 2021 Admit Card & Exam Date :  ज्या उमेदवारांनी नोंदणी केली आहे, त्यांनी एनबीईच्या अधिकृत वेबसाइटवर (nbe.edu.in.) जावून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

NEET PG 2021 : नीट पीजीचे प्रवेश पत्र 'nbe.edu.in' या वेबसाइटवर होणार जाहीर; अशा पहा परीक्षेच्या तारखा..

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सातारा : NEET PG 2021 Admit Card & Exam Date : राष्ट्रीय परीक्षा मंडळ (NBE) राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा-पदव्युत्तरचे (NEET PG 2021) प्रवेशपत्र देणार आहे. ज्या उमेदवारांनी नोंदणी केली आहे, त्यांनी एनबीईच्या अधिकृत वेबसाइटवर (nbe.edu.in.) जावून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. दरम्यान, बोर्ड 12 एप्रिल 2021 रोजी आपल्या वेबसाइटवर प्रवेश पत्र अपलोड करणार असल्याचे NEET ने सांगितले आहे. 

एनबीईनुसार, प्रवेश पत्र ऑनलाइन अपलोड करण्याची माहिती उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबर, एसएमएस आणि ईमेलद्वारे दिली जाईल. NBE उमेदवारांना प्रवेश पत्र पोस्ट किंवा ईमेलद्वारे पाठविणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर ज्या उमेदवारांचे अर्ज कोणत्याही कारणास्तव स्वीकारले गेले नाहीत, अशा उमेदवारांची प्रवेशपत्रे दिली जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

परदेशातील कॉलेजमध्ये स्टायपेंड कशी मिळते; जाणून घ्या काही सविस्तर

NEET PG Admit Card 2021 : डाउनलोड कसे करावे?

प्रवेशपत्र जाहीर झाल्यानंतर, उमेदवारांनी एनबीईच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. तद्नंतर मुख्य पृष्ठावर 'नीट पीजी 2021' दुव्यावर क्लिक करावे. त्यानंतर नवीन पृष्ठ उघडेल. जेथे एनईईटी पीजी 2021 प्रवेश पत्र दुव्यावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर लॉगिन पृष्ठावर आवश्यक तपशील प्रविष्ट केल्यानंतर, आपले प्रवेशपत्र संगणकाच्या स्क्रीनवर दिसेल. ते पत्र डाउनलोड करा आणि हार्ड कॉपीचे एक प्रिंट आउट आपल्याकडे ठेवा.

इंडियन नेव्ही जॉब्स : 710 ट्रेड्‌समन भरती परीक्षा ऍडमिट कार्ड जाहीर ! ही घ्या थेट लिंक

NEET PG 2021 Exam Date

देशातील शासकीय किंवा खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय पदव्युत्तर डॉक्टर, शस्त्रक्रिया पदव्युत्तर पदविका आणि पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा घेतली जाते. यावर्षी ही परीक्षा 18 एप्रिल 2021 रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 5:30 या वेळेत घेण्यात येणार आहे. तर, एनईईटी पीजी 2021 चा निकाल 31 मे 2021 रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.

loading image