संधी करिअरच्या... : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च

बेसिक सायन्समधील संशोधनासाठी कार्य करणाऱ्या संस्था समूहाचा म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) बद्दल जाणून घेणार आहोत.
Career-Opportunity
Career-OpportunitySakal
Summary

बेसिक सायन्समधील संशोधनासाठी कार्य करणाऱ्या संस्था समूहाचा म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) बद्दल जाणून घेणार आहोत.

- सविता भोळे

बेसिक सायन्समधील संशोधनासाठी कार्य करणाऱ्या संस्था समूहाचा म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) बद्दल जाणून घेणार आहोत.

अत्याधुनिक संशोधनासाठी अंडर ग्रॅज्युएट लेव्हलपासून अत्युच्च बुद्धिमत्ता असलेले विद्यार्थी घडावेत व त्यांनी संशोधनात अधिकाधिक प्रगती करावी या उद्देशाने ‘आयआयएसईआर’ची स्थापना २००६-२००७ मध्ये भारत सरकारतर्फे करण्यात आली. संपूर्ण भारतात सात ‘आयआयएसईआर’ची सुरुवात केली गेली. त्यात कलकत्ता, पुणे, मोहाली, भोपाल, तिरुअनंतपुरम, तिरुपती, बेरहमपूर यांचा समावेश आहे. या सर्व संस्थांना २०१२मध्ये ‘राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था’ म्हणून भारतीय संसदेकडून घोषित केले गेले. या स्वायत्त असून विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे मास्टर्स आणि डॉक्टरल डिग्रीज प्रदान केल्या जातात.

या संस्थांमध्ये बायोलॉजिकल सायन्स, केमिकल सायन्स, डेटा सायन्स, अर्थ अँड क्लायमेट सायन्सेस, इकॉनॉमिक सायन्सेस, इंजिनिअरिंग सायन्सेस (केमिकल इंजिनिअरिंग, डेटा सायन्स अँड इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अँड कॉम्प्युटर सायन्स), जिऑलॉजिकल सायन्स, मॅथेमॅटिकल सायन्स व फिजिकल सायन्स विषयातील BS-MS व Ph.D प्रोग्रॅम राबविले जातात. यातील इकॉनॉमिक सायन्स व इंजिनिअरिंग सायन्सेसमधील कोर्सेस फक्त भोपाळ येथे उपलब्ध आहेत.

‘आयआयएसईआर’मधून शिक्षण घेतलेले ५०-६० टक्के विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी इतर नॅशनल इंटरनॅशनल संस्थांमध्ये प्रवेश घेतात व संशोधनाचे काम करतात. टीआयएफआर, हार्वर्ड युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग, प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी या संस्थांमधून जॉब ऑफर्स या विद्यार्थ्यांना मिळतात.

‘आयआयएसइआर’मधील ५ वर्षीय BS-MS कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी संस्थेतर्फे स्वतंत्र प्रवेश परीक्षा (IAT) घेतली जाते. या परीक्षेसाठी संस्थेच्या ॲडमिशन पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावयाचा असतो. ही परीक्षा साधारण मे मध्ये घेतली जाते.

परीक्षेचे स्वरूप

MCQ type paper based/

computer based

गुण : १८०

प्रश्न : ६० (मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री व बायॉलॉजी प्रत्येकी १५ प्रश्न)

बरोबर उत्तरासाठी प्रत्येकी ३ गुण तर

चुकीच्या उत्तरासाठी प्रत्येकी १ गुण वजा केला जातो. देशातल्या विविध केंद्रांवर ही परीक्षा

घेतली जाते. या कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी KVPY व JEE advanced मधील स्कोअरही ग्राह्य धरला जातो. अशा विद्यार्थ्यांना वरील प्रवेश परीक्षेतून सूट मिळते.

‘आयआयएसईआर’ पुणे येथे उपलब्ध कोर्सेस

BS-MS

कालावधी : ५ वर्षे

पात्रता : बारावी सायन्स ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण (SC/ST करिता ५५ टक्के गुण)

प्रवेश परीक्षा : IAT/KVPY/JEE advanced

हा कोर्स बायॉलॉजी, फिजिक्स, मॅथेमॅटिक्स, केमिस्ट्री या विषयांमध्ये उपलब्ध आहे.

MSc + Ph.D

कालावधी : ७ वर्षे

पात्रता : त्या त्या विषयातील पदवी उत्तीर्ण

प्रवेश परीक्षा : IIT-JAM/NBHM/JEST

हा कोर्स बायॉलॉजी, फिजिक्स, मॅथेमॅटिक्स, केमिस्ट्री या विषयांमध्ये उपलब्ध आहे

Ph.D

कालावधी : ६ वर्षे

पात्रता : त्या त्या विषयातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण

प्रवेश परीक्षा : GATE

हा कोर्स बायॉलॉजी, फिजिक्स, मॅथेमॅटिक्स, केमिस्ट्री, अर्थ अँड अ‌‍‌‌टमॉस्फेरिक सायन्स, इंटरडिसीप्लिनरी आणि ह्युमॅनिटीज् अँड सोशल सायन्स या सात विषयांमध्ये उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी विद्यार्थी संस्थेच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट देऊ शकतात.

संकेत स्थळ : www.iiserpune.ac.in

उर्वरित ६ ‘आयआयएसईआर’मधील कोर्सेस बद्दल माहिती आपण त्या या संकेतस्थळाला भेट देऊन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com