करिअरच्या वाटेवर : इंडियन स्टॅटेस्टिकल इन्स्टिट्यूट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Statistical Institute

इंडियन स्टॅटेस्टिकल इन्स्टिट्यूट(ISI) ही उच्च शिक्षण व संशोधनासाठीची अग्रगण्य संस्था असून तिला ‘इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स’ अशी मान्यता भारतीय संसदेकडून मिळालेली आहे.

करिअरच्या वाटेवर : इंडियन स्टॅटेस्टिकल इन्स्टिट्यूट

- सविता भोळे

इंडियन स्टॅटेस्टिकल इन्स्टिट्यूट(ISI) ही उच्च शिक्षण व संशोधनासाठीची अग्रगण्य संस्था असून तिला ‘इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स’ अशी मान्यता भारतीय संसदेकडून मिळालेली आहे. ही स्टॅटेस्टिकमध्ये काम करणारी सर्वात जुनी संस्था १९३१मध्ये प्रशांत चंद्र महालनोबिस व त्यांच्या सहकाऱ्यांच्या संकल्पनेतून कोलकता येथे स्थापन झाली.

या संस्थेचे कार्य बघून अमेरिकेमध्ये स्थापन होणाऱ्या स्टॅटेस्टिकल इन्स्टिट्यूटसाठी मॉडेल म्हणून तिचा वापर झाला. भारतासारख्या विकसनशील देशातील संस्थेचा मॉडेल म्हणून विचार करणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. सध्या ही संस्था स्टॅटेस्टिक्स, कॉम्प्युटर सायन्स, क्वांटिटेटिव्ह इकॉनॉमिक्स व संबंधित विज्ञान शाखांमध्ये प्रशिक्षण व संशोधनासाठी जगातील अग्रगण्य संस्था म्हणून नावाजलेली आहे. संस्थेचे पश्चिम बंगालमध्ये बारानगर, कलकत्ता येथे मुख्य कार्यालय आहे तर दिल्ली, बंगळूर, चेन्नई व तेजपूर येथे उपकेंद्र आहेत. वडोदरा, गिरिध, हैदराबाद, मुंबई आणि पुणे येथे स्टॅटेस्टिकल क्वॉलिटी कंट्रोल आणि रिसर्च ऑपरेशन्ससाठी केंद्र आहेत. संस्थेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागतो.

महत्त्वाचे कोर्सेस

१) बॅचलर ऑफ स्टॅटेस्टिक्स (B Stat-Hons)

 • कालावधी - ३ वर्षे

 • पात्रता - बारावी

 • प्रवेश परीक्षा - संस्थेची प्रवेश परीक्षा

२) बॅचलर ऑफ मॅथेमॅटिक्स (B Maths)

 • कालावधी - ३ वर्षे

 • पात्रता - बारावी

 • प्रवेश परीक्षा - संस्थेची प्रवेश परीक्षा

३) मास्टर ऑफ स्टॅटेस्टिक्स (M.Stat)

 • कालावधी - २ वर्षे

 • पात्रता - बी-स्टॅट, बीई (स्टॅटेस्टिक्स), बी. मॅथ्स्, स्टॅटेस्टिक्स मेथड आणि ॲनालिलिसमधील पदव्युत्तर डिप्लोमा

 • प्रवेश परीक्षा - संस्थेची प्रवेश परीक्षा

४) मास्टर ऑफ सायन्स (M.Sc- Economics)

 • कालावधी - २ वर्षे

 • पात्रता - पदवी

 • प्रवेश परीक्षा : संस्थेची प्रवेश परीक्षा

५) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (PGDM -Business Analytics)

 • कालावधी - २ वर्षे

 • पात्रता - पोस्ट ग्रॅज्युएशन

 • प्रवेश परीक्षा - संस्थेची प्रवेश परीक्षा व इंटरव्ह्यू

६) मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी (M.Tech)

 • कालावधी - २ वर्षे

 • पात्रता - पदवी

 • प्रवेश परीक्षा : GATE

 • हा कोर्स : १) कॉम्प्युटर सायन्स २) क्वॉलिटी रिलायबिलिटी अँड ऑपरेशन्स रिसर्च ३) क्रिप्टोलॉजी अँड सिक्युरिटी या विषयांमध्ये चालविला जातो.

७) मास्टर ऑफ मॅथेमॅटिक्स (M.Maths)

 • कालावधी - २ वर्षे

 • पात्रता - बी. मॅथ्स्, बी.ई, बी.टेक (मॅथ्स्)

 • प्रवेश परीक्षा - संस्थेची प्रवेश परीक्षा

८) मास्टर ऑफ सायन्स (MS)

 • कालावधी - २ वर्षे

 • पात्रता - कोणतीही पदवी बारावी मॅथ्ससह

 • प्रवेश परीक्षा - संस्थेची प्रवेश परीक्षा व इंटरव्ह्यू

 • हा कोर्स : १) क्वांटिटेटिव्ह इकॉनॉमिक्स, २) क्वॉलिटी मॅनेजमेंट सायन्स या विषयांमध्ये चालविला जातो.

९) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा

 • कालावधी - १ वर्ष

 • पात्रता - पदवी मॅथ्ससह

 • प्रवेश परीक्षा - संस्थेची प्रवेश परीक्षा व इंटरव्ह्यू

१०) पीएच. डी. (Ph.D)

 • कालावधी - ३ वर्षे

 • पात्रता - संबंधित विषयातील पोस्ट ग्रॅज्युएशन

 • प्रवेश परीक्षा - संस्थेची प्रवेश परीक्षा व इंटरव्ह्यू

 • हा कोर्स : १) कॉम्प्युटर सायन्स २) स्टॅटेस्टिक्स ३) मॅथेमॅटिक्स ४) क्वांटिटेटिव्ह इकॉनॉमिक्स ५) क्वॉलिटी, रिलायबिलिटी अँड ऑपरेशन्स रिसर्च या विषयात चालविला जातो.

११) ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (JRF)

 • कालावधी - ६ वर्षे

 • पात्रता - संबंधित विषयातील पोस्ट ग्रॅज्युएशन

 • प्रवेश परीक्षा - संस्थेची JRF ॲडमिशन टेस्ट व इंटरव्ह्यू

 • हा कोर्स : १) स्टॅटेस्टिक्स २) कॉम्प्युटर सायन्स ३) मॅथेमॅटिक्स ४) क्वांटिटेटिव्ह इकॉनॉमिक्स ५) बायोलॉजिकल सायन्स ६) जिओलॉजी ७) क्वॉलिटी रिलायबिलिटी अँड ऑपरेशन्स रिसर्च ८) फिजिक्स अँड अप्लाईड मॅथेमॅटिक्स या विषयांमध्ये चालविला जातो.

अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

संकेतस्थळ - www.isical.ac.in

Web Title: Savita Bhole Writes Career Route Indian Statistical Institute

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :educationjobCareerroute