संधी करिअरच्या... : शिक्षण क्षेत्रात जायचंय... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Career-Opportunity
संधी करिअरच्या... : शिक्षण क्षेत्रात जायचंय...

संधी करिअरच्या... : शिक्षण क्षेत्रात जायचंय...

- सविता भोळे

प्रादेशिक शिक्षण संस्था रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन (RIE)

शालेय शिक्षणामध्ये गुणवत्तापूर्ण सुधारणा होण्याच्या उद्देशाने शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या व नोकरीत असलेल्या शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी तसेच संबंधित संशोधन, विकास व विस्तारासाठी एनसीईआरटीतर्फे (दिल्ली) या संस्था १९६३ मध्ये भारताच्या विविध भागांमध्ये सुरू करण्यात आल्या. शिक्षकांचे शिक्षण व प्रशिक्षण यासाठी अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन संस्था शिक्षणातील नवनवीन बदल व त्या अनुषंगाने येणारी आव्हाने पेलण्यासाठी कार्य करत आहेत. ही संस्था भारतात अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर, मैसूर आणि शिलाँग येथे आहे. शिक्षण प्रक्रिया अधिक चांगली व्हावी, त्यात नावीन्यपूर्ण बदल करता यावेत यासाठी अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर आणि म्हैसूर येथील संस्थेसोबत प्रायोगिक बहुउद्देशीय शाळा (DMS) सुद्धा जोडल्या आहेत जेणेकरून तेथे शिकत असलेल्या भावी शिक्षकांना त्यांचा उपयोग प्रयोगशाळेत सारखा होईल व शिक्षणातील नवीन संशोधनाला प्रात्यक्षिकाची जोड मिळेल. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ भोपाळ येथे प्रवेश घेता येतो. या संस्थेत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, गोवा या राज्यातील तसेच दादरा आणि नगर-हवेली व दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो.

‘आरआई’ मध्ये उपलब्ध कोर्सेस

1) B.Sc. B.Ed (Physical Science and Biological Science)

कालावधी : ४ वर्षे पात्रता : बारावी सायन्स ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण (SC/ST करिता ४५ टक्के)

2) B.A. B.Ed. : कालावधी : ४ वर्षे पात्रता : बारावी ५० टक्क्यांसह कुठल्याही शाखेतून उत्तीर्ण (SC/ST करिता ४५ टक्के)

3) B.Ed. : कालावधी : २ वर्षे पात्रता : B.A./B.Sc. (५० टक्के गुणांसह उत्तीर्ण)

4) M.Ed. : कालावधी : २ वर्षे पात्रता : B.Ed. (किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण)

B.A. B.Ed./B.Sc. B.Ed. (किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण) (SC/ST करिता ४५ टक्के)

वरील सर्व कोर्सेस करिता एनसीईआरटी (दिल्ली) तर्फे आरआयई सीईई ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. याचे प्रवेश अर्ज संकेतस्थळावर उपलब्ध असतात. याकरिता रजिस्ट्रेशन सुमारे मेच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होते.

ही परीक्षा तीन गटात घेतली जाते. परीक्षेमध्ये त्या-त्या गटाच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे खालील विषयांवर ८० प्रश्न असतात :

1) Language Proficiency (English)

2) Teaching Aptitude

3) Logical Reasoning

शिक्षण क्षेत्रात जाऊ इच्छिणारे विद्यार्थी संस्थेच्या संकेतस्थळावर जाऊन अधिक माहिती घेऊ शकतात.

संकेतस्थळ : https://riebhopal.nic.in

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top