इंजिनिअर्स तरुण-तरुणींनींना SBIमध्ये नोकरीची संधी; कोणतीही लेखी परीक्षा नाही

टीम ई-सकाळ
Tuesday, 19 January 2021

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख - ११ जानेवारी होती त्यात आता वाढ करण्यात आली असून २७ जानेवारीपर्यंत अर्ज करता येतील.

SBI jobs for Engineers: पुणे : जर तुमच्याकडे इंजिनिअरिंगची (BE/B.Tech) डिग्री असेल, तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) नोकरीची एक चांगली संधी तुमच्याकडे चालून आली आहे. एसबीआयने इंजिनिअर्ससाठी भरती काढली आहे. याबाबत अधिक माहिती पुढीलप्रमाणे -

या पदांवर करण्यात येणाऱ्या भरतसाठी कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. अर्जांची छाननी केल्यानंतर उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल आणि त्याआधारे उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल. 

MMRDA Jobs 2021: इंजिनिअर तरुण-तरुणींनो आताच करा अर्ज; पगार १ लाख ७७ हजारापर्यंत​

वेतन -
या पदांवर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना २३,७०० ते ४२,०२० रुपये दरमहा वेतन मिळेल. 

तपशील - 
ही भरती प्रक्रिया इंजिनिअर (फायर) या पदांसाठी राबविली जात आहे. एकूण १६ पदे रिक्त आहेत. नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजमधून बीई (फायर) किंवा यूजीसी (UGC)/एआयसीटीई (AICTE) प्रमाणित विद्यापीठातून बीटेक पर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना चांगली संधी आहे. यासाठी ४० वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

दहावी-बारावी पास उमेदवारांसाठी मोठी संधी; फक्त मुलाखत द्या अन् सरकारी नोकरी मिळवा​

महत्त्वाच्या तारखा - 
- ऑनलाइन अर्ज करण्यास सुरवात- २२ डिसेंबर २०२०
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख - ११ जानेवारी होती त्यात आता वाढ करण्यात आली असून २७ जानेवारीपर्यंत अर्ज करता येतील. 
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीची लिंक बातमीच्या शेवटी दिली आहे.  

अर्जासाठी फी - 
जनरल, ईडब्ल्यूसी आणि ओबीसी उमेदवारांना ७५० रुपये फी भरावी लागेल. तर एससी, एसटी आणि दिव्यांगांना कोणतीही फी भरावी लागणार नाही.

महत्त्वाच्या लिंक्स -
- SBI ची अधिसूचना (Notification) पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा
- SBI च्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे ► क्लिक करा
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे ► क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SBI Engineer Recruitment 2021 Vacancy for 16 Posts BTech Pass can Apply