MMRDA Jobs 2021: इंजिनिअर तरुण-तरुणींनो आताच करा अर्ज; पगार १ लाख ७७ हजारापर्यंत

टीम ई-सकाळ
Thursday, 14 January 2021

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ फेब्रुवारी २०२१ आहे.

MMRDA Recruitment 2021: पुणे : जर तुम्ही मुंबईत राहत असाल आणि नोकरीच्या शोधत असाल तर एक चांगली संधी तुमच्यासाठी चालून आली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (Mumbai Metropolitan Region Development Authority, MMRDA) मुंबई, मध्ये विविध पदे रिक्त आहेत.

सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ अभियंता (सिव्हिल), सिनिअर सेक्शन इंजिनिअर, सेक्शन इंजिनिअर एस अँड टी, पर्यवेक्षक (सुपरवायजर) या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. एकूण १२७ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

DRDO Jobs: तरुण-तरुणींनो, कोणतीही परीक्षा न देता मिळवा नोकरी​

या पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी एमएमआरडीएच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ फेब्रुवारी २०२१ आहे.

शैक्षणिक पात्रता -

सहाय्यक व्यवस्थापक (असिस्टंट मॅनेजर) - सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदवी किंवा पदविका प्राप्त करणे आवश्यक आहे.

स्टेशन मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेमधून इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल, अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स या विषयात बॅचलर डिग्री प्राप्त करणे आवश्यक आहे.

स्टेशन इंजिनिअर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेमधून मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, अप्लाइड इलेक्ट्रीक्स आणि इतर कॅटेगरीमधून पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे. 

UPSC Recruitment 2021: सहाय्यक प्राध्यापक आणि संचालक पदासाठी निघाली भरती​ 

वेतन - 

सहाय्यक व्यवस्थापक (असिस्टंट मॅनेजर) - ५६,१०० - १,७७,५०० रुपये

स्टेशन व्यवस्थापक (स्टेशन मॅनेजर) - ४१,८०० - १,३२,३०० रुपये

मुख्य रहदारी नियंत्रक (चीफ ट्रॅफिक कंट्रोलर) - ४१,८०० - १,३२,३०० रुपये

वरिष्ठ विभाग अभियंता (सीनिअर सेक्शन इंजिनिअर) - ४७,६०० - १,३२,३०० रुपये

विभाग अभियंता (सेक्शन इंजिनिअर) - ४१,८०० - १३,२३० रुपये

पर्यवेक्षक (सुपरवायजर) - ४१,८०० - १,३२,३०० रुपये 

IAF Recruitment 2021: १२वी पास उमेदवारांनो, एअरमन पदांसाठी निघाली भरती!​

महत्त्वाच्या लिंक्स - 
- अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे ► क्लिक करा
- अधिसूचना पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे ►
 क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MMRDA Recruitment 2021 Apply Online Engineer and other posts