राज्यातील शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर | Scholarship Exam Result | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Scholarship
राज्यातील शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर

राज्यातील शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर

sakal_logo
By
सम्राट कदम @namastesamrat

पुणे - पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसलेले सरासरी १५ टक्के विद्यार्थी पात्र ठरले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने बुधवारी अंतरिम निकाल घोषित करण्यात आले आहे. राज्यात एकूण पाच लाख ४७ हजार ७०८ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले होते. त्यातील ८१ हजार २९४ परीक्षार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहे.

ऑगस्ट २०२१ मध्ये पार पडलेल्या या परीक्षेसाठी इयत्ता पाचवीतील तीन लाख ८८ हजार ५१५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. तर इयत्ता आठवीतील दोन लाख ४४ हजार ३१४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. प्रत्यक्ष परीक्षेला अनुक्रमे तीन लाख ३७ हजार ३७० आणि दोन लाख १० हजार ३३८ विद्यार्थी उपस्थित होते. यातील सरासरी १४.८४ टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्वच केंद्रांवरील परीक्षा रद्द करण्यात आली होती. शाळांना निकाल त्यांच्या लॉगीनमधून तर पालकांना संकेतस्थळावर पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी अर्ज करता येणार आहे.

निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ https://www.mscepuppss.in/

राज्यस्तरीय निकाल

तपशील पाचवी आठवी

हजर परीक्षार्थी ३३७३७० २१०३३८

पात्र परीक्षार्थी ५७३३२ २९९६२

पात्र टक्केवारी १६.९९ ११.३९

हेही वाचा: पुणे : समाविष्ट ३४ गावातील नागरिकांना लाभ मिळण्याचा प्रस्ताव लांबणीवर

विभागवार निकाल (टक्के) -

विभाग पाचवी आठवी

मुंबई १६.९१ १३.४२

पुणे १७.७९ १३.४२

नाशिक १५.८४ ९.९०

कोल्हापुर २२.४३ १७.८५

औरंगाबाद १८.५० ८.७१

अमरावती १७.८९ ८.९०

नागपुर १०.८८ ४.३७

लातूर ११.९७ ८.४७

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यायची असेल तर संबंधीत शाळांच्या लॉगीनद्वारे ५ डिसेंबर पर्यंत अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच, विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, पालकांचे नाव, पत्ता आदी दुरूस्त करण्याची सुविधाही या तारखेपर्यंत उपलब्ध असेल. गुणपडताळणी संदर्भातील निर्णय शाळांना ३० दिवसांच्या आत कळविण्यात येईल.

- तुकाराम सुपे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

loading image
go to top