
शालेय विद्यार्थ्यांचा गणित आणि विज्ञानाचा पाया कच्चा
पुणे - राज्यातील इयत्ता पाचवी, आठवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे गणित आणि विज्ञानाचा पाया कच्चा असल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय उपलब्धी सर्वेक्षणातून(नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे- एनएएस) समोर आली आहे. या सर्वेक्षणात त्या-त्या इयत्तानिहाय अभ्यासक्रमाशी निगडित प्रश्न विचारले असता विद्यार्थ्यांना दिलेल्या गणित, विज्ञान विषयातील कामगिरी ही ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय उपलब्धी सर्वेक्षण (एनएएस) हे राष्ट्रीय पातळीवर इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणातून काय साध्य केले, हे पाहण्यासाठी करण्यात येते. यामध्ये राज्यातील सरकारी, अनुदानित, खासगी विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात येते. त्यानुसार राज्यातील साक्षरता दर हा ८२.३ टक्के इतका असल्याचे आढळून आले आहे.
भाषा कौशल्य, गणित, पर्यावरण, विज्ञान आणि सामाजिकशास्त्र, इंग्रजी यातील मूल्यांकन करण्यात आले आहे. यामध्ये तिसरीसह पाचवी, आठवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे भाषा विषयातील कामगिरी मात्र ६० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे.
विद्यार्थ्यांचे म्हणणे टक्केवारीत :
प्रश्न : तिसरी : पाचवी : आठवी : दहावी
- शाळेत जायला आवडते का : ९९ टक्के : ९८ टक्के : ९८ टक्के : ९८ टक्के
- शिक्षकांनी शिकविलेले विद्यार्थ्यांना कळते का : ९८ टक्के : ९८ टक्के : ९८ टक्के : ९८ टक्के
- शैक्षणिक कामगिरीत पालकांचा पाठिंबा मिळतो का : ८६ टक्के : ८५ टक्के : ८३ टक्के : ८४ टक्के
शिक्षकांचे वाढतयं ‘टेन्शन’
शिक्षक म्हणतात,
प्रश्न : तिसरी : पाचवी : आठवी : दहावी
कामाचा अतिताण पडतो : ३३ टक्के : २८ टक्के : २६ टक्के : २७ टक्के
असा झाले सर्वेक्षण :
तपशील : देश : महाराष्ट्र
- शाळांची संख्या : १,१८,२७४ : ७,२२६
- शिक्षकांची संख्या : ५,२६,८२४ : ३०,५६६
- विद्यार्थ्यांची संख्या : ३४,०१,१५८ : २,१६,११७
- साक्षरता दर : ७३ टक्के : ८२.३ टक्के
Web Title: School Students Mathematics And Science Base Is Raw
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..