अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या शाळांनी नियोजित वेळापत्रकानुसार कार्यवाही करावी : शिक्षण आयुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

school corse

अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या शाळांनी नियोजित वेळापत्रकानुसार कार्यवाही करावी : शिक्षण आयुक्त

पुणे : ‘‘राज्यातील ज्या शाळांचा अभ्यासक्रम अद्याप शिकवून पूर्ण झालेला नाही. अशा शाळांना एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या शाळांनी त्याच्या नियोजित वेळापत्रकानुसार कार्यवाही करावी,’’ असे स्पष्टीकरण शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले आहे.

इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या शाळा पूर्ण क्षमतेने सुरू कराव्यात याबाबत शालेय शिक्षण विभागाने २४ मार्च रोजी अध्यादेश काढला. यामध्ये एप्रिल अखेरपर्यंत शाळा सुरू ठेवाव्यात, असा उल्लेख केला होता. त्यावरून शाळांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. याबाबत मांढरे म्हणाले,‘‘शासन निर्णयामध्ये कोठेही मे -जून महिन्याबाबत काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या नाहीत. एप्रिल महिन्यात शाळा सुरू ठेवण्याबाबत सूचना आहेत, परंतु ज्या शाळांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही, ज्यांना अधिक तासिका घेण्याची गरज आहे.

अशा शाळांना ही मुभा दिली आहे. तसेच अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे, अशा शाळांनी त्याची परीक्षा प्रक्रिया पूर्व नियोजित वेळेप्रमाणे सुरूच ठेवावी. ज्या शाळांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पुरेसा कालावधी हवा आहे, त्यांना रविवारी देखील शाळा सुरू ठेवून अधिक तासिका घेण्याची मुभा देण्यात आली आहे. अशा शाळांनी एप्रिलच्या शेवटी परीक्षा घ्यावी आणि मे महिन्यात निकाल जाहीर करून उन्हाळी सुट्या दरवर्षीप्रमाणे द्याव्यात.’’

Web Title: Schools Completed Course Action Schedule Commissioner Of Education

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top