
नागपूर : अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी महाविद्यालयात प्रवेशाच्या शेवटच्या दिवशीपर्यंत ९ हजार ६५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळविले. तिसऱ्या फेरीची तयारी सुरू करण्यात आली असून, २६ जुलैला महाविद्यालयांचा प्रवेशाच्या अलॉटमेंटची यादी जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांना २८ जुलैपर्यंत प्रवेश निश्चिती करावी लागेल.