

Why Self Learning Matters in Modern Education
Sakal
मृदुला अडावदकर ( सर्जनशील व आंतरविद्याशाखीय शिक्षणतज्ज्ञ )
नव्या वाटा
तीही नाकारलं तरी शाळेत गेल्यावर प्रत्येक विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या क्लासला जातच असतो. अगदी पहिलीपासून किंवा कधी कधी तर बालवर्गापासून क्लासला जाणारी मुले मी पाहिली आहेत. विशेषतः कष्टकरी वर्ग, ज्यांची पहिली पिढी इंग्रजी माध्यमात शिकते आहे; त्या पालकांना ‘क्लास’ हा मोठा आधार वाटतो. क्लास लावण्याचा दबाव पालक आणि विद्यार्थी दोघांवरही तेवढाच असतो. या गदारोळात दर वर्षी आपल्या मुलांना, विशेषतः दहावीतल्या मुलांनाही जाणीवपूर्वक कोणताही ‘क्लास’ न लावणारे काही पालकही पाहायला मिळतात. ‘हे फारच धाडसी बुवा!’ म्हणून इतर पालकगटांमध्ये त्यांच्याबद्दल चर्चाही घडतात. हे विद्यार्थी दहावीत उत्तम गुणांनी पास होताना दिसतात. परंतु, पुढे बारावीत मात्र स्पर्धा परीक्षांचे क्लास ते लावतातच.