
Success Tips For New Hires: "आपला विहित अभ्यासक्रम पूर्ण करून प्राप्त यशासह "कॅंपस ते कॉर्पोरेट" अशा नव्या क्षेत्रात प्रवेश करणे ही बाब संबंधित युवा उमेदवाराच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असतो. या नवागतांची नेमणूक ही संबंधित कंपनी व्यवस्थापनासाठीसुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. कारण नव्याने येणाऱ्या या शिक्षित आणि उत्साही युवकांमधूनच उद्याचे व्यवस्थापन नेतृत्व घडत असते."