ऐका व जिंका!

ऐका व जिंका!

ज्ञान मिळवण्याचा, माहिती संपादन करण्याचा सर्वांत सोपा आणि सहज मार्ग म्हणजे ऐकणे. दोन कान, पण एकच तोंड देऊन निसर्गानेही हेच सूचित केले आहे की, आपण जास्त ऐकले पाहिजे. मागील लेखात ऐकणे receptive skill असल्याचे पाहिले. बोलण्यापेक्षा ऐकणे अधिक महत्त्वाचे आहे. आपण बोलताना माहिती असलेले, वाचलेलेच बोलत असतो, पण ऐकताना कधी न ऐकलेले, वाचलेले गवसण्याची शक्यता असते. ज्ञान आणि माहिती इतकेच आव्हानात्मक आहे एखाद्याचे हृदय जिंकणं, हेही केवळ ऐकण्यामुळेच सहज शक्य होते! बारकाईने निरीक्षण केल्यास आपल्या लक्षात येईल की, दोन कान योग्य प्रकारे एकत्र जोडल्यास हृदयासारखा आकार तयार होतो. बऱ्याच वेळेला उत्तम प्रकारे ऐकल्यामुळे नाती आणखी मजबूत होतात आणि नकळतच आपण इतरांची हृदये जिंकू लागतो. लक्ष देऊन ऐकल्यामुळे संकल्पना स्पष्ट होतात, गैरसमज टाळले जाऊ शकतात. नवीन शब्द, नवीन वाक्यरचना कळतात. त्यामुळे आजपासून शक्य तिथे कान देऊन इंग्लिश ऐकायचे आणि ते ही शक्य तितक्या आदर्श पद्धतीने. ते कसे ते पाहूयात. 

Eye contact
बोलणाऱ्या व्यक्तीकडे पाहा. बऱ्याच वेळा बोलणाऱ्याने वापरलेला नवीन शब्द, जो कदाचित आपण ऐकलेला नसतो, तो बोलणाऱ्याच्या देहबोलीतून समजू शकतो. 

Active Vocabulary 
म्हणजे असे शब्द जे बोलणाऱ्याकडून संभाषणात सहजपणे वापरले जातात. ऐकलेल्या नवीन शब्दांची, वाक्यांची नोंद ठेवल्यास आपणही दैनंदिन व्यवहारात त्यांचा वापर करू शकतो. ऐकलेले नवीन शब्द, म्हणी, वाक्‍प्रचार जाणीवपूर्वक, अगदी ठरवून पुनःपुन्हा वापरून आपल्या दैनंदिन व्यवहारातील वापरात त्या शब्दरचना रुळवू शकतो. यामुळे कधीच वापरात नसलेले दर्जेदार शब्द आपल्याकडून सहज वापरले जाऊ शकतील, म्हणजेच ते शब्द आपल्या Active Vocabulary मध्ये समाविष्ट होतील.

Be Patient
ऐकताना एखादा शब्दप्रयोग आपल्यासाठी अगदीच अनोळखी असतो. अशा वेळी त्यावर जास्त विचार न करता आपले लक्षपूर्वक ऐकणे चालू ठेवावे. कदाचित वक्त्याच्या पुढील काही वाक्यांवरून त्या  शब्दाचा अर्थ समजण्याची शक्यता असते. त्यामुळे संयम ठेवून ऐकत राहावे. बोलणाऱ्यांचे संपल्यावरच आपण बोलले पाहिजे.

Listen to understand
बऱ्याचदा आपण संभाषण करताना, विशेषतः इंग्लिशमध्ये संभाषण करताना बोलणाऱ्यांचे ऐकून घेण्यापेक्षा आपण काय बोलणार आहे, यावर विचार करत असतो. त्यामुळे ऐकणे राहूनच जाते. यासाठी ऐकताना आपले विचार बाजूला ठेवून ऐकले पाहिजे. 

Repeat to Receive
आपण इंग्लिश भाषेतील एखादा व्हिडिओ किंवा ऑडिओ ऐकत असताना न समजलेला भाग पुनःपुन्हा ऐकल्यास तो भाग समजणे शक्य होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com