Baramati News : बारामतीमधील शारदाबाई पवार विद्यानिकेतन शाळा राज्यस्तरावर दुसऱ्या क्रमांकावर

- ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानांतर्गत पारितोषिके जाहीर
shardabai pawar vidyaniketan school in baramati ranked second in the state
shardabai pawar vidyaniketan school in baramati ranked second in the stateSakal

Pune News : शालेय शिक्षण विभागाच्या वतीने ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत घेतलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत वाशीम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा साखरा आणि नाशिकमधील एस्पेलियर हेरिटेज स्कूल बेळगाव धागा या शाळांना पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे.

तर पुणे जिल्ह्यातील शारदाबाई पवार विद्यानिकेतन (शारदानगर, बारामती) या शाळेने खासगी शाळा गटात राज्यस्तरावरील दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे. विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण मिळावे, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान राबविण्याचा निर्णय नोव्हेंबर २०२३मध्ये घेण्यात आला.

त्यानुसार एक जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत राज्यात हे अभियान राबविण्यात आले. या अभियानात सरकारी आणि खासगी व्यवस्थापनाच्या एकूण एक लाख तीन हजार ३१२ शाळांनी सहभाग नोंदविला. या शाळांमधील एक कोटी ९९ हजार ६१ हजार ५८६ विद्यार्थी देखील अभियानात सहभागी झाले.

अभियानांतर्गत शाळांचे विविध स्तरावर मूल्यांकन करण्यात आले. मूल्यांकनाच्या आधारे राज्यस्तरीय, बृहनमुंबई महापालिका, अ आणि ब वर्ग महापालिका, विभागस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय अशा स्तरावरील पारितोषिक शिक्षण विभागाने जाहीर केली आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार पारितोषिकांचे वितरण

‘‘शालेय शिक्षण विभागातर्फे ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानांतर्गत गौरव पुरस्कार प्रदान सोहळा येत्या मंगळवारी (ता. ५) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. हा सोहळा मुंबईतील नरिमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या टाटा थिएटरमध्ये दुपारी एक वाजता होईल.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत,’’ अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली.

अभियानात सहभागी शाळांची संख्या

शाळांचे प्रकार : संख्या

सरकारी : ६४,३१२

खासगी : ३९,०००

एकूण : १,०३,३१२

उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांची संख्या

विद्यार्थी : १,०४,६४,४२०

विद्यार्थिनी : ९४,९७,१६६

एकूण : १,९९,६१,५८६

राज्यस्तरीय पारितोषिकासाठी निवड झालेल्या शाळा

क्रमांक : गट : निवड झालेल्या शाळांची नावे :

पहिला क्रमांक : शासकीय : जिल्हा परिषद साखरा (जि./ता. वाशीम)

पहिला क्रमांक : खासगी : एस्पेलियर हेरिटेज स्कूल बेळगाव धागा (जि./ता. नाशिक)

दुसरा क्रमांक : शासकीय : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेदवली (जि. रायगड, ता. कर्जत)

दुसरा क्रमांक : खासगी : शारदाबाई पवार विद्यानिकेतन, शारदानगर (जि. पुणे, ता. बारामती)

तिसरा क्रमांक : शासकीय : जिल्हा परिषद शाळा धालेवाडी (जि. सांगली, ता. कवठेमहांकाळ)

तिसरा क्रमांक : खासगी : भोंडवे पाटील शाळा, बजाजनगर (जि. छत्रपती संभाजीनगर, ता. गंगापूर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com