शिक्षण चिंतन : कला शिक्षणाला जोड अभिव्यक्तीची

शाळांमधील कलाशिक्षणात विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या अनुभव, भावना आणि विचारांना सर्जनशील अभिव्यक्ती देणारे मुक्त वातावरण निर्माण करण्याची गरज अधोरेखित
Shikshan Chintan: Connecting Art Education with Creative Self-Expression by Dr. Milind Naik

Shikshan Chintan: Connecting Art Education with Creative Self-Expression by Dr. Milind Naik

SAKAL

Updated on: 

डॉ. मिलिंद नाईक प्राचार्य, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला

कला म्हणजे अनुभव, भावना, विचार आणि कल्पना यांना एखाद्या माध्यमातून व्यक्त करण्याची प्रक्रिया. चित्रकला, शिल्पकला, संगीत-गायन, वादन, नृत्य, नाटक, साहित्य-वक्तृत्व, लेखन अशी कलेची विविध माध्यमे आहेत. कुणी चित्रातून, कुणी शिल्पातून, कुणी कवितेतून किंवा गद्यातून, तर कुणी गायन अथवा वादनातून आपल्या मनातील भावना आणि विचार व्यक्त करतो. प्रत्येक कलामाध्यमाची अभिव्यक्तीची साधने वेगळी असतात. नृत्य आणि नाटकात शरीराच्या हालचाली, हावभाव, अभिनय आणि शब्द; वक्तृत्व आणि लेखनात शब्द; संगीतामध्ये सूर, ताल आणि लय; तर चित्रकला आणि शिल्पकलेत दृश्य रूप ही अभिव्यक्तीची माध्यमे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com