संधी रोजगाराच्या :  कोरोनाचा कॅम्पस प्लेसमेंटवर परिणाम 

शीतलकुमार रवंदळे
Thursday, 28 May 2020

जगातील बऱ्याच देशांच्या आर्थिक प्रगतीत अडथळा येत असल्यामुळे त्याचा काही प्रमाणात नोकऱ्यांवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे, मात्र तरीही नोकऱ्यांच्या बऱ्यापैकी संधी उपलब्ध असतील.

कोरोनाचा परिणाम सर्वच क्षेत्रात होत आहे. रोजगार व कॅम्पस प्लेसमेंटच्या क्षेत्रात देखील याचे परिणाम दिसत आहेत. जगातील बऱ्याच देशांच्या आर्थिक प्रगतीत अडथळा येत असल्यामुळे त्याचा काही प्रमाणात नोकऱ्यांवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे, मात्र तरीही नोकऱ्यांच्या बऱ्यापैकी संधी उपलब्ध असतील. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या अंतिम वर्षातील तरुणांच्या (२०२० बॅच) कॅम्पस प्लेसमेंटवर परिणाम ः 

१. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत आतापर्यंत साधारण ७० ते ८० टक्के प्लेसमेंट आधीच झाले आहे. कारण प्रत्येक वर्षाच्या जुलै-ऑगस्टमध्ये अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटला सुरुवात होते. 

२. काही कंपन्यांचे ऑफ कॅम्पस प्लेसमेंट जुलै-ऑगस्टमध्ये होईल. मेगाभरती करणाऱ्या (मास रिक्रुटर) कंपन्यांपैकी सर्वच कंपन्या दिलेल्या ऑफर्सनुसार मुलांना येत्या काही महिन्यांत जॉइनिंग देतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. 

या नोकऱ्या रद्द करणार नसल्याचे सूतोवाच संबंधित कंपन्याकडून करण्यात आले आहे, मात्र काही विद्यार्थ्यांना उशीरा समाविष्ट करून घेणार असल्याची शक्यता आहे. सिस्को, पेप्सिको, बाओकॉन यांसारख्या कंपन्यांनी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्रच्या विद्यार्थ्यांना व्हर्च्यूअल ऑनबोर्डिंगच्या माध्यमातून रुजू करून घेतले आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर, गोदरेज यांसारख्या कंपन्यांनी व्हर्च्यूअल इंटर्नशिपसाठी विद्यार्थ्यांना रुजू करून घेतले आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

२०२१च्या कॅम्पस प्लेसमेंटवर परिणाम ः 
२०२१च्या बॅचचा विचार केल्यास असे लक्षात येते की, सर्व मेगा भरती करणाऱ्या टीसीएस, कॅपजेमिनी, इन्फोसिस यांसारख्या कंपन्या याही वर्षी कॅम्पस प्लेसमेंटमधून विद्यार्थ्यांची निवड करतील, मात्र ऑफर्स कमी असतील. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे असेल व यावर्षी कंपन्या विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी जरा उशिराने येतील. बऱ्याचशा कंपन्या मुलाखतीसकट रोजगारभारतीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करतील. 

भविष्यातील जास्त मागणी असणारे तंत्रज्ञान :  
- डिजिटल 
- डेटा ॲनालिटिक्स 
- कोअर डोमेन स्पेशालिस्ट 
कोरोनानंतर येथ असतील संधी 
- कृषी 
- आरोग्य सेवा 
- क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर 
- उत्पादन 
- पायाभूत सुविधा 
- सायबर सिक्युरिटी 
- इन्शुरन्स 
- ऑनलाइन शिक्षण 
- इ-कॉमर्स 
- स्किल डेव्हलपमेंट 
- स्थानिक पर्यटन (आंतरराष्ट्रीय पर्यटनऐवजी) 

घरबसल्या करता येणारे जॉब : 
१. आयटी डोमेन 
२. मार्केटिंग 
३. सेल्स 
४. संशोधन आणि विकास 

प्रचंड मागणी असणारे जॉब : 
१. डिजिटल आणि मार्केटिंग 
२. सिस्टिम ऑपरेटर 
३. हेल्थकेअर स्पेशालिस्ट 
४. कंटेंट रायटर्स 

कोरोनामुळे अपेक्षित बदल :  
१. घरबसल्या काम करण्याचे प्रमाण वाढणार 
२. स्टार्टअप कंपन्यांना अधिक संधी 
३. ऑनलाइन इंटर्नशिपसाठी मोठी मागणी 
४. कंत्राटी पद्धतीचे रोजगार वाढवून कायमस्वरूपी निश्चित पगाराच्या नोकऱ्यांचे प्रमाण कमी होणार 
५. शिक्षण पद्धतीत ऑनलाइनचे प्रमाण वाढणार 
६. विद्यार्थ्यांसाठी आवडीप्रमाणे व स्वतः शिकता येणाऱ्या कोर्सेसची संधी 

रोजगारासंदर्भातील काही सकारात्मक बातम्या :  
१. २० मार्च ते २० एप्रिल दरम्यान विविध कंपन्यांतर्फे सुमारे २,००,००० रोजगारांच्या जाहिराती 
२. वरील २ लाखपैकी सुमारे ८०,००० नोकऱ्या नवीन पदवीधारकांसाठी होत्या. 

भारतासाठी सकारात्मक :  
१. जपान, युरोप, अमेरिकन कंपन्यांचा चीनमधून काढता पाय, ही भारतासाठी सुवर्णसंधी. 
२. भारत सरकारच्या २० लाख कोटीच्या पॅकेजमुळे अर्थव्यवस्थेला गती मिळणार. 
३. अमेरिकेसारख्या विकसित देशातून रिव्हर्स ब्रेन ड्रेन झाल्याने अनेक भारतीय परतणार. 
४. विदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण खूप कमी होणार. (दरवर्षी सुमारे ८ लाख विद्यार्थी विदेशात जातात.) ही भारतीय शैक्षणिक संस्थांसाठी सुवर्णसंधी असेल. 
५. शैक्षणिक क्षेत्राला उद्योगातील कर्मचाऱ्यांना रिस्किल करण्याची संधी मिळणार. 

लॉकडाउनमध्ये विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटसाठी काय करावे?  
- २० ते २५ ॲप्टिट्युड सराव परीक्षा 
- मेगाभरती करणाऱ्या कंपन्यांसाठी त्यांच्या पॅटर्नच्या ४ ते ५ सराव परीक्षा 
- २ ते ३ सराव मुलाखती 
- २ ते ३ सराव गट चर्चा 
- प्रोग्रामिंगसाठीचा सराव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shitalkumar ravandale article Corona impact on campus placement