engineer
engineer

एका अभियंत्याची उद्योगभरारी!

इंजिनिअरिंग करत असतानाच  उद्योजक बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या समाधान वाघ या अभियंता तरुणाचा उद्योग क्षेत्रातील प्रवास आपण जाणून घेणार आहोत. अत्यंत कमी किमतीत उत्तम दर्जाचे अभियांत्रिकी अभ्यासक्रमामधील विविध विषयांचे व्हिडिओ समाधानची कंपनी TeachMax विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देते. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्वतः अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना आपल्या इच्छेनुसार मूड होईल तेव्हाच आपल्याला कोणीतरी शिकवायला हवे, असे त्याला वाटायचे आणि याच कल्पनेवर आधारित उद्योग स्वतः आयटी अभियंता बनल्यानंतर त्याने सुरू केला. एक वर्षाचा छोट्या कंपनीतील अनुभव घेऊन सुरुवातीला डीबीएम इन्फोटेक (DBM Infotech) नावाने  CRM, HRM , Inventory Management , ERP या क्षेत्रातील ग्राहकांच्या गरजेप्रमाणे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट व सर्व्हिस देणारी कंपनी त्याने सुरू केली. छोट्या व मध्यम क्षेत्रातील (MSME) उद्योगांना ब्रॅन्डेड कंपन्यांची महागडी ERP उत्पादने परवडणारी नसल्याने त्यांची गरज समजून त्यांच्या गरजेप्रमाणे ERP सॉफ्टवेअर बनवून देणारी उत्पादने समाधानच्या कंपनीने बनवली. एवढ्या कमी किमतीत मिळणारी ERPची उत्पादने चांगल्या दर्जाची असल्याने ती खूपच उपयोगी ठरली. आज ‘डीबीम इन्फोटेक’चे (www.DBMinfotech.co.in) १०० कोटींपेक्षा जास्त महसूल असणारे सुमारे ५० समाधानी ग्राहक आहेत. 

मनाला वाटेल त्यावेळी अभियांत्रिकी विषयाचे व्हिडिओ विद्यार्थ्यांना पाहण्याची सोय २४ X ७ करून देण्याचे स्वप्न समाधनला स्वस्थ बसू देत नव्हते. त्याप्रमाणे त्याने या प्रोजेक्टवर काम सुरू केले. उत्तम शिक्षक शोधून त्यांच्याकडून व्हिडिओ तयार करून घेण्यास कंपनीने सुरुवात केली. यावेळी व्हिडिओची गुणवत्ता उत्तम राहील याकडेही त्यांनी लक्ष दिले. Teach Max Learning App या नावाने अँड्रॉइडच्या प्ले स्टोअरवर त्यांचे मोबाईल ॲप उपलब्ध असून, सुमारे २० हजार विद्यार्थी हे व्हिडिओ वापरत आहेत. संपूर्ण भारतातूनच नव्हे, तर इतर देशांतून देखील अनेक विद्यार्थी आता हे व्हिडिओ पाहतात. www.TeachmaxVideos.com या वेबसाइटवर या व्हिडिओंची यादी असून, विद्यार्थी आवडत्या अभियांत्रिकी विषयांचे व्हिडिओ मोबाईलवर डाउनलोड करतात.

या प्रवासात पुढे काय योजना आहेत, याविषयी सांगताना समाधान म्हणतो, ‘‘जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचे ज्ञान चांगल्या शिक्षकांमार्फत पोचवण्यासाठी व उद्योगाची वाढ करण्यासाठी फंडिंगच्या शोधात असून, वेगवेगळ्या व्हेंचर कॅपिटलिस्टकडे मी बिझनेस प्रपोजल पाठविले आहेत.’’

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आजच्या तरुणाईची करिअरबद्दलची आवड-निवड पाहिल्यास असे दिसून येते, की बऱ्याचशा तरुणांना स्वतःचा उद्योग सुरू करण्याची इच्छा असते. पूर्वीच्या काळी स्वतःचा उद्योग सुरू करण्याची इच्छा असणारे तरुण-तरुणी खूपच कमी होते. मात्र, आजच्या युवा पिढीत हे प्रमाण बरेच जास्त आहे. 

प्रौढ आणि उद्योजक
समाधानसारख्या अनेक युवकांच्या मनातील उद्योजक बनण्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी समाजाने देखील साथ दिली पाहिजे. विविध देशांत उद्योजकतेसंदर्भात किती उपक्रम राबविले जातात, याचा वर्ल्ड ‘इकॉनॉमिक फोरम’चा अहवाल खालीलप्रमाणे आहे. विविध देशांतील प्रौढ व्यक्तींपैकी किती जण स्वतःचे उद्योग सुरू करतात, याचा अभ्यास करून EDI संस्थेने अहवाल दिला आहे. त्यानुसार भारतातील सुमारे ५% प्रौढ व्यक्ती स्वतःचा उद्योग सुरू करतात. हेच प्रमाण ब्राझीलमध्ये १७% तर, चीनमध्ये ८% आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com