
प्रमाणपत्रावर आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय प्रशासनाने यापूर्वीच घेतला आहे. परिणामी द्वैभाषिक प्रमाणपत्रावर ते असणार आहेच.
कोल्हापूर : यंदापासून शिवाजी विद्यापीठाचे (Shivaji University Kolhapur) पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate) मराठी व इंग्रजी भाषेत विद्यार्थ्यांच्या हाती सोपवले जाणार आहे. मुंबई व पुणे विद्यापीठानंतर शिवाजी विद्यापीठात द्वैभाषिक स्वरूपातील प्रमाणपत्र देण्यास सुरुवात होत आहे. त्याबाबतचा निर्णय विद्यापरिषदेत झाला असून, द्वैभाषिक प्रमाणपत्र छापण्यासाठी आवश्यक तयारी करण्यात आली आहे.