शिवाजी विद्यापीठातील ७२ पदांच्या भरतीला मान्यता मिळाली. त्यात सहायक प्राध्यापकांची ६२ आणि सहयोगी प्राध्यापकांच्या १० पदांचा समावेश होता.
कोल्हापूर : राज्यातील अकृषी विद्यापीठांत अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेस शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता शिवाजी विद्यापीठातील (Shivaji University) विविध विषयांच्या प्राध्यापकांच्या ७२ पदांची भरती (Professor Posts Recruitment) पुन्हा सुरू होणार आहे.