विद्यापीठाने माहिती-तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावीपणे वापर करून पदवी प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देण्याची प्रक्रिया अधिक सोयीस्कर केली आहे.
-संतोष मिठारी
कोल्हापूर : पहिल्यांदा अर्ज, त्यानंतर शुल्क आणि त्या पाठोपाठ तक्रार निवारणाची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देत शिवाजी विद्यापीठ (Shivaji University Kolhapur) अगदी थेट विद्यार्थ्यांना त्यांच्या हातातील मोबाईलच्या माध्यमातून पदवी प्रमाणपत्र (डिग्री) देत आहे. विद्यापीठाच्या या सकारात्मक पावलाने विद्यार्थी, प्रशासनाचा वेळ, श्रम आणि खर्चाची बचत झाली आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डिग्री (Graduation Certificate) मिळविण्याची प्रक्रिया सोयीस्कर बनली आहे.