मुलांनो, यासाठी शिका कोडिंग... 

श्वेता दांडेकर
Wednesday, 13 January 2021

आपण कोडिंगचा विचार करताना सहसा आयटी नोकऱ्या‍ किंवा सॉफ्टवेअर कंपन्यांचा विचार करतो. मात्र, तंत्रज्ञान सर्वत्र आहे, संगणक हळूहळू प्रत्येक क्षेत्राचा अविभाज्य भाग बनत आहेत.

आपण कोडिंगचा विचार करताना सहसा आयटी नोकऱ्या‍ किंवा सॉफ्टवेअर कंपन्यांचा विचार करतो. मात्र, तंत्रज्ञान सर्वत्र आहे, संगणक हळूहळू प्रत्येक क्षेत्राचा अविभाज्य भाग बनत आहेत – ते वैद्यकीय, संगीत, खगोलशास्त्र, शेती किंवा वन्यजीव संवर्धनातही आहेत. संगणकाची मूलभूत माहिती शिकणे हे गणिताची मूलतत्त्वे शिकणे किंवा कोणत्याही भाषेत संभाषण शिकण्याइतकेच महत्त्वाचे झाले आहे. कोडिंग या तंत्रज्ञानाशी मुलांना ओळख करून देण्याचा एक चांगला आणि त्याबरोबर एक मजेशीर मार्ग आहे. 

कोडिंगचे फायदे 
१. आत्मविश्वासाने समस्यांचे निराकरण 
एखादी समस्या उद्भवल्यावर आपण निराकरण होईपर्यंत बऱ्याचदा वेगवेगळ्या निराकरणाचा प्रयत्न करतो. यास बराच वेळ लागू शकतो. कोडिंग समस्या प्रभावीपणे सोडवण्याविषयीचे शास्त्र आहे. समस्या समजून घेणे, तिला लहान समस्यांमध्ये वाटणे, उपायांचे स्टेप बाय स्टेप नियोजन करणे आणि त्यानंतर काही त्रुटी असल्यास निराकरण करणे. हे कौशल्य कोणत्याही परिस्थितीत किंवा नोकरीमध्ये हस्तांतरीय आहे. 

कोडिंग म्हणजे नक्की काय?

२. सर्जनशीलतेत वाढ 
एखादी निर्मिती करणे कायमच रोमांचकारी असते - हे कोडिंगलाही लागू आहे. आपण कोडिंगच्या मूलभूत संकल्पना समजून घेतल्या आणि त्यावर सराव केल्यास आपण वेबसाइट्स, व्हिडिओ गेम, मोबाइल अॅप्स, रोबोट्स आणि ड्रोन तयार करू शकता. 

३) मुलांमधील चिकाटी वाढते 
क्लिष्ट समस्येचे निराकरण करण्यासाठी थोडा वेळ लागतो आणि उपायांमध्ये त्रुटीही असतात. कार्य साध्य करणारा प्रोग्राम तयार करणे आणि त्याची देखरेख करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. हे मुलांना चिकाटीचे महत्त्व शिकवते. 

प्रवाहाविरुद्ध जाणे किंवा फक्त नोकरी मिळविण्यासाठी कोडिंग शिकणे महत्त्वाचे नाही. ते आपल्याला महत्त्वपूर्ण कौशल्ये विकसित करण्यात मदत करते. हे आपल्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करावा, हे देखील आपल्याला शिकवते. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shweta dandekar write article about benefits of coding