

2026 JEE exam
esakal
पुणे - राष्ट्रीय पातळीवर देशातील नामांकित संस्थांमध्ये अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतलेल्या ‘जेईई मेन’ दुसऱ्या सत्रातील परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) निकाल जाहीर केला असून यात देशातील २६ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल मिळाले आहेत. यात महाराष्ट्रातील सिद्धार्थ आठले आणि माधव विराडिया यांनी १०० पर्सेंटाईल मिळविले आहे. यातील माधव याने जेईई पहिल्या आणि दुसऱ्या अशा दोन्ही सत्रात १०० पर्सेंटाईल मिळविल्याचा विक्रम केला आहे.