Study With Job : विद्यार्थ्यांनो नोकरीसोबत अभ्यासही करायचा 'या' स्मार्ट Tips चा करा अवलंब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Study

Study With Job : विद्यार्थ्यांनो नोकरीसोबत अभ्यासही करायचा 'या' स्मार्ट Tips चा करा अवलंब

Smart Study : असे बरेच विद्यार्थी आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे. त्यात अनेक विद्यार्थी स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करतात. मात्र, यामुळे विद्यार्थ्यांची (Student) तारेवरची कसरत होते. आज आम्ही तुम्हाला अभ्यासस करता करता वेळेचा सदुपयोग करून नोकरीसोबत (Job) अभ्यास (Study) कसा करता येईल याबाबतच्या काही खास टिप्स सांगणार आहोत. (How To Do Study While Doing Job)

हेही वाचा: Knowledge For Students: विद्यार्थ्यांसाठी Career Guidance का महत्वाचे?

stressed student

stressed student

थोडा खर्च करावा लागेल

नोकरी करताना अभ्यासही करायचा असे तर, यासाठी तुम्हाला एक टॅबलेट विकत घ्यावा लागेल. हा टॅब विकत घेताना तो महागडाच असावा असे बिलकुल आवश्यक नाही. अनेक कंपन्यांचे चांगले टॅब्लेटही स्वतःत उपलब्ध आहेत.

टॅब आकाराने लहान असल्याने तो कुठेही नेण्यात अडचण होत नाही. जर तुम्हाला टॅब घेणे परवडत नसेल तर, तुम्ही तुमचा स्मार्टफोनही (Smart Phone) वापरू शकता. परंतु त्यात नोट्स बनवण्यात तुम्हाला अडचण येऊ शकता.

हेही वाचा: Salary Hike: 2023 मध्ये भारतात सर्वात जास्त पगारवाढ, वाचा काय म्हणतो रिपोर्ट

अॅपद्वारे स्मार्ट अभ्यास

नोकरीसोबत अभ्यास करताना टॅबमध्ये तुम्ही एखादे चांगले अॅप डाउनलोड करू शकता. ज्यामध्ये तुम्हाला नोट्स बनवता येतील. यासाठी तुम्ही मायक्रोसॉफ्टचा वननोट या अॅपचा विचार करू शकता. यामध्ये तुम्ही विविध विषयानुसार नोट्स बनवू शकता. केवळ कीवर्ड टाकून तुम्ही ज्या विषयाच्या नोट्स तुम्हाला हव्या आहेत. त्या तुम्हाला काही क्षणात शोधता येतात.

या अॅपमध्ये तुम्ही तुमच्या प्रत्येक अध्यायाच्या पृष्ठाला वेगवेगळे रंग देऊ शकता. यामुळे तुमचा अभ्यास अधिक मनोरंजक होईल. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्ही तुमच्या विषयाशी संबंधित इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या विषयाशी संबंधित लिंक त्या विषयाशी संबंधित टाकू शकता.

online study

online study

हेही वाचा: Earn Money Online: जुन्या फोनच्या मदतीने कमवा रोज हजारो रुपये, फक्त हे काम करा

कुठेही अभ्यास करणे सोपे

तुमच्याकडे टॅब असल्यास आणि त्यात OneNote किंवा तत्सम अॅप असल्यास तुम्ही तुमचा अभ्यास कुठेही आणि कधीही करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही मेट्रो किंवा बसने ऑफिसमध्ये प्रवास करत असाल तर, तुम्ही प्रवासादरम्यानही अभ्यास करू शकता तसेच यावेळेत नोट्स बनवू शकता.

वेळापत्रक तयार करणे आवश्यक

ऑफिसच्या कामानंतर तुम्ही उर्वरित वेळेचे योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला वेळापत्रक बनवावे लागेल. वेळापत्रकाची मांडणी करताना ते असे असू नये की, त्याची अंमलबजावणी करणे कठीण होईल. वेळापत्रकाची मांडणी करताना यामध्ये स्वतःसाठीदेखील वेळ काढणे आवश्यक आहे.

हेही वाचा: Career Guide : करिअर निवडण्याआधी या टिप्स करा फॉलो; नाहीतर होईल पश्चाताप

इंटरनेटची घ्या मदत

नोकरी करताना अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये तसेच अभ्यासात अपडेटेड राहण्यासाठी तुम्ही इंटरनेटचा वापर करू शकता. इंटरनेटचा वापरामुळे तुम्हाला कमी वेळेत अधिक माहिती मिळवण्यासाठी फायदा होईल. मात्र, इंटरनेटवर अभ्याससासंबंधी माहिती घेताना त्याच्या स्त्रोताची विश्वासार्हता तपासणे महत्वाचे आहे. याशिवाय तुम्ही साप्ताहिक सुटीच्या काळात अभ्यासासाठी थोडा अधिक वेळ देऊ शकता.