esakal | बॅंक ऑफ बडोदामध्ये मॅनेजरच्या 511 पदांची होतेय भरती ! अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस

बोलून बातमी शोधा

Bank of Barora
बॅंक ऑफ बडोदामध्ये मॅनेजरच्या 511 पदांची होतेय भरती ! अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस
sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : भारतात आंतरराष्ट्रीय बॅंक मानली जाणारी बॅंक ऑफ बडोदाच्या वेल्थ मॅनेजमेंट डिपार्टमध्ये विविध पदांवर भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहे. वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर, ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर, टेरिटरी हेड, ग्रुप हेड, प्रॉडक्‍ट हेड (इन्व्हेस्टमेंट अँड रिसर्च), हेड (ऑपरेशन्स अँड टेक्‍नॉलॉजी), डिजिटल सेल्स मॅनेजर आणि आयटी फंक्‍शनल ऍनालिस्ट यांच्या एकूण 511 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याचा आज (ता. 29) शेवटचा दिवस आहे. ही भरती अर्ज प्रक्रिया 9 एप्रिल 2021 रोजी सुरू झाली.

जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

बॅंक ऑफ बडोदामध्ये 511 व्यवस्थापक आणि इतर पदांच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना बॅंकेच्या अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर भेट दिल्यानंतर करिअर विभागात जावे लागेल, जिथे संबंधित भरतीची जाहिरात लिंक व ऑनलाइन अर्ज लिंक दिली आहे. दिलेल्या अर्जाच्या लिंकवर किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवर क्‍लिक करून उमेदवार अर्ज पेजवर जाऊ शकतात. अर्जाच्या पेजवर उमेदवारांना आवश्‍यक तपशील भरावा लागेल आणि विविध कागदपत्रांच्या सॉफ्ट प्रती अपलोड कराव्या लागतील. तसेच ऑनलाइन पद्धतीने बॅंकेने ठरविल्यानुसार उमेदवारांना 600 रुपये शुल्क भरावे लागेल. एससी, एसटी आणि महिला उमेदवारांसाठी बॅंकेने 100 रुपये अर्ज शुल्क निश्‍चित केले आहे. शुल्क भरल्यानंतर उमेदवार अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात. उमेदवारांनी भविष्यातील आवश्‍यकता लक्षात घेऊन सादर केलेल्या अर्जाची सॉफ्ट कॉपी ऑनलाइन डाउनलोड करावी.

या पदांसाठी होणार भरती

  • सिनिअर रिलेशनशिप मॅनेजर : 407 पदे

  • ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर : 50 पदे

  • टेरीटरी हेड : 44 पदे

  • ग्रुप हेड : 6 पदे

  • प्रॉडक्‍ट हेड (इन्व्हेस्टमेंट अँड रिसर्च) : 1 पद

  • हेड (ऑपरेशन्स अँड टेक्‍नॉलॉजी) : 1 पद

  • डिजिटल सेल्स मॅनेजर : 1 पद

  • आईटी फंक्‍शनल ऍनालिस्ट मैनेजर : 1 पद