esakal | पदवीधरांसाठी सामाजिक न्याय मंत्रालयात सरकारी नोकरीची संधी ! दरमहा 75 हजार रुपये वेतन
sakal

बोलून बातमी शोधा

Union Ministry of Social Justice and Empowerment

पदवीधरांसाठी सामाजिक न्याय मंत्रालयात सरकारी नोकरीची संधी ! दरमहा 75 हजार रुपये वेतन

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयात (Union Ministry of Social Justice and Empowerment) सरकारी नोकरीची (Government Job) संधी आहे. मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व संस्था यांच्या देखरेखीसाठी दोन वर्षे कराराच्या आधारे 23 तरुण पदवीधर उमेदवारांच्या भरतीसाठी जाहिरात देण्यात आली आहे. सामाजिक न्याय मंत्रालयाने जाहीर केलेल्या भरती जाहिरातीनुसार, नॅशनल इन्स्टिट्यूट रॅंकिंग फ्रेमवर्क (National Institute Ranking Framework) (एनआयआरएफ 2020) मध्ये पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवार मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आलेल्या ऑनलाइन अर्जाच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया 1 मेपासून सुरू झाली आहे आणि उमेदवार 31 मे 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतात. (Government job opportunities in the Union Ministry of Social Justice for graduates)

हेही वाचा: "आयसीएसआय'ने दिली कंपनी सेक्रेटरी जून परीक्षांसाठी पुन्हा संधी ! जाणून घ्या सविस्तर

कोण करू शकेल अर्ज?

मंत्रालयात यंग ग्रॅज्युएटच्या भरतीसाठी तेच उमेदवार अर्ज करू शकतात एनआयआरएफ 2020 रॅंक प्राप्त विद्यापीठ किंवा इतर उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही विषयात बॅचलर पदवी उत्तीर्ण झालेला आहे. तसेच अर्ज करण्याच्या तारखेनुसार उमेदवाराचे वय 25 वर्षांपेक्षा कमी असावे.

हेही वाचा: मेडिकल ऑफिसर पदांसाठी "सीआरपीएफ'मध्ये भरती ! 17 मे रोजी होणार इंटरव्ह्यू

निवड प्रक्रिया

सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने प्राप्त केलेल्या अर्जांपैकी रिक्त पदांच्या संख्येच्या 10 पट म्हणजे 230 उमेदवारांची त्यांच्या संस्थेच्या, सामाजिक कार्याच्या आणि शैक्षणिक कामगिरीच्या आधारे यादी केली जाईल. या शॉर्टलिस्टेड उमेदवारांना मंत्रालयातर्फे घेण्यात येणारी ऍप्टिट्यूड टेस्ट, ग्रुप डिस्कशन आणि मुलाखत द्यावी लागणार आहे. हे सर्व टप्पे 15 जून ते 30 जून 2021 या कालावधीत घेण्यात येतील. सर्व टप्प्यांच्या कामगिरीच्या आधारे योग्य उमेदवारांची निवड केली जाईल.

नियुक्ती आणि पगार

विहित निवड प्रक्रियेद्वारे निवडलेल्या उमेदवारांची नियुक्ती 15 जुलै 2021 पूर्वी मंत्रालयाच्या प्रोजेक्‍ट मॉनिटरिंग युनिट (पीएमयू) मध्ये केली जाईल. पीएमयू मंत्रालयाच्या अंतर्गत नॅशनल डिफेन्स सोसायटी इन्स्टिट्यूट (एनआयएसडी) प्लॉट नं. जी 2, द्वारका, नवी दिल्ली येथील सेक्‍टर 10 मध्ये आहे. नियुक्त केलेल्या उमेदवारांना मंत्रालयामार्फत दरमहा 75 हजार रुपये पगार देण्यात येईल.