esakal | "इस्रो'मध्ये अधिकारी पदांवर भरती ! 56 हजार रुपये पगार व मिळणार "हे' लाभ आणि भत्ते
sakal

बोलून बातमी शोधा

ISRO

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organization : ISRO) इस्रोने ग्रुप-ए गॅझेटेड ऑफिसर व नॉन-गॅझेटेड ऑफिसर या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत आहे. 

"इस्रो'मध्ये अधिकारी पदांवर भरती ! 56 हजार रुपये पगार व मिळणार "हे' लाभ आणि भत्ते

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organization : ISRO) इस्रोने ग्रुप-ए गॅझेटेड ऑफिसर व नॉन-गॅझेटेड ऑफिसर या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत आहे. या भरती मोहिमेच्या माध्यमातून विविध विभागांमध्ये एकूण 24 रिक्त पदे भरली जातील. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट www.isro.gov.in वर भेट देऊन अर्ज करू शकतात. 

भारतीय अंतराळ संशोधन केंद्राने (इस्रो) 1 एप्रिल 2021 रोजी नोटिफिकेशन जारी केले आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 एप्रिल असून, फी भरण्याची शेवटची तारीख 23 एप्रिल 2021 आहे. 

इस्रोमध्ये भरावयाची पदे 

  • प्रशासकीय अधिकारी (ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर) : 4 पदे 
  • लेखा अधिकारी (अकाउंट्‌स ऑफिसर) : 4 पदे 
  • पर्चेस अँड स्टोअर्स ऑफिसर : 9 पदे 

अवकाश विभागांतर्गत स्वायत्त संस्थेत भरावयची पदे 

  • प्रशासकीय अधिकारी (ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर) : 2 पदे 
  • लेखा अधिकारी (अकाउंट्‌स ऑफिसर) : 2 पदे 
  • पर्चेस अँड स्टोअर्स ऑफिसर : 3 पदे 

पदांनुसार आवश्‍यक शैक्षणिक पात्रता व अनुभव 

  • प्रशासकीय अधिकारी : एमबीएसह सुपरवायझरी पदावर एक वर्षाचा अनुभव किंवा पदव्युत्तर पदवीबरोबर तीन वर्षांचा अनुभव (तीन वर्षे पर्यवेक्षकीय क्षमतेचा अनुभव) किंवा 2 वर्षांचा अनुभव असलेले पदवीधर (पर्यवेक्षीय क्षमतेत 2 वर्षे) 
  • लेखा अधिकारी : एसीए / एफसीए किंवा एआयसीडब्ल्यूए / एफआयसीडब्ल्यूए किंवा एमबीए + पर्यवेक्षी क्षमता किंवा एमकॉममधील 1 वर्षाचा अनुभव किंवा एमकॉम + तीन वर्षांचा अनुभव (पर्यवेक्षी क्षमतेतील एक वर्ष) किंवा पाच वर्षांच्या अनुभवासह बी.कॉम. / बीबीए / बीबीएम (पर्यवेक्षी क्षमतेत 2 वर्षे) केलेला असावा 
  • पर्चेस अँड स्टोअर्स ऑफिसर : मार्केटिंग किंवा मटेरियल मॅनेजमेंटमधील एमबीए + पर्यवेक्षी क्षमतेचा एक वर्षाचा अनुभव किंवा पदव्युत्तर + पदव्युत्तर पदविका (किंवा पर्चेस अँड स्टोअर्स ऍक्‍टिव्हिटी संबंधित अन्य विषय ज्यामध्ये एक वर्ष पर्यवेक्षी क्षमतेशी संबंधित फिल्ड) किंवा 3 वर्षांच्या अनुभवासह पदव्युत्तर पदवी असलेल्या संबंधित क्षेत्रात पर्यवेक्षी क्षमतेमध्ये एक वर्ष किंवा पाच वर्षांच्या अनुभवासह पदवीधर आणि संबंधित क्षेत्रात पर्यवेक्षी क्षमतेचा दोन वर्षांचा अनुभव असलेले पदवीधर. 

वयोमर्यादा 
इस्रो भरती 2021 साठी वयोमर्यादा 35 वर्षांपर्यंत आहे. तथापि सरकारी नियमांनुसार आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी वयाची सवलत देण्यात येईल. 

निवड प्रक्रिया 
पात्र उमेदवारांची निवड लेखी परीक्षा व मुलाखत फेरीत मिळालेल्या संख्येच्या आधारे मेरीट यादीच्या माध्यमातू केली जाईल. लेखी परीक्षेत 60 टक्के आणि मुलाखतीत 40 टक्‍के यानुसार परफॉर्मन्स पाहिली जाईल. 

पगार व भत्ते 
निवड झालेल्या उमेदवारांना पे-मॅट्रिक्‍स लेव्हल -10 मध्ये दरमहा 56,100 रुपये दिले जातील. याशिवाय महागाई भत्ता (डी.ए.), घरभाडे भत्ता (एचआरए) आणि परिवहन भत्ता (टीए) यांचाही फायदा होईल. भरती संबंधित अधिक माहितीसाठी नोटिफिकेशन लिंक ISRO Recruitment 2021 Notification link वर क्‍लिक करा. 

इस्रो भरती 2021 साठी अर्ज कसा करावा? 
1 ते 21 एप्रिल 2021 पर्यंत केवळ ऑनलाइनद्वारे (ISRO Recruitment 2021 Online Apply link) अर्ज भरले जाऊ शकतात. नोंदणीनंतर अर्जदारांना एक ऑनलाइन नोंदणी क्रमांक दिला जाईल, जो भविष्यातील संदर्भासाठी काळजीपूर्वक हाताळावा लागेल. अर्जाची फी 250 रुपये आहे.

loading image