esakal | इंदिरा गांधी अणू संशोधन केंद्रात विविध पदांसाठी होणार भरती ! "या' दिवसापर्यंत करा अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

IGCAR

इंदिरा गांधी अणू संशोधन केंद्रात विविध पदांसाठी भरती! "या' दिवसापर्यंत करा अर्ज

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

सोलापूर : भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागात सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी ! विभागांतर्गत इंदिरा गांधी सेंटर फॉर ऍटोमिक रिसर्च (आयजीसीएआर) ने ग्रुप ए, ग्रुप सी आणि स्टायपेंड ट्रेनी अशा एकूण 337 रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

केंद्राने जारी केलेल्या भरती जाहिरातीनुसार (क्रमांक IGCAR/02/2021) जाहिरातीत दिलेल्या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करू इच्छिणारे उमेदवार आयजीसीएआरच्या अधिकृत वेबसाइट igcar.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतील. आज (15 एप्रिल) पासून ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि 14 मे 2021 रोजी उमेदवार रात्री 11.59 पर्यंत अर्ज करू शकतील.

असे करा अर्ज

अर्जासाठी उमेदवारांना इंदिरा गांधी अणू संशोधन केंद्राच्या (आयजीसीएआर) igcar.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भरती विभागात जावे लागेल. यानंतर संबंधित भरती जाहिरात सक्रिय करण्यासाठी लिंकवर क्‍लिक करा. यानंतर उमेदवार अर्ज पेजवर प्रवेश करण्यास सक्षम असेल. तेथे मागण्यात आलेला तपशील भरून आणि त्यांच्या कागदपत्रांची स्कॅन प्रत अपलोड करून उमेदवार आपला अर्ज सबमिट करू शकतील. उमेदवारांनी नोंद घ्यावी, की ऑनलाइन अर्जाच्या वेळी त्यांना 300 रुपये शुल्क भरावे लागेल, जे ऑनलाइन पद्धतीने भरता येईल. त्याचबरोबर अनुसूचित जाती आणि जमाती उमेदवारांसाठी अर्जाची फी 200 रुपये आहे.

या पदांसाठी होणार भरती

  • सायंटिफिक ऑफिसर : 4 पदे

  • टेक्‍निकल ऑफिसर : 42 पदे

  • टेक्‍निशियन बी (क्रेन ऑपरेटर) : 1 पद

  • स्टेनोग्राफर ग्रेड 3 : 4 पदे

  • अपर डिव्हिजन क्‍लर्क : 8 पदे

  • ड्रायव्हर : 2 पदे

  • सिक्‍युरिटी गार्ड : 2 पदे

  • वर्क असिस्टंट : 20 पदे

  • कॅंटीन अटेंडेंट : 15 पदे

  • स्टायपेंड्री ट्रेनी : 239 पदे