
सोलापूर : केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत इंटेलिजेन्स ब्यूरो असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेन्स ऑफिसर ग्रेड 2 / एक्झिक्युटिव्ह (एसीआयओ -2) भरती परीक्षा टियर -1 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. एमएचए आयबी एसीआयओ 2021 टियर -1 परीक्षा 2021 मध्ये जे उमेदवार सामील होते ते आता आयबीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचे निकाल तपासू शकतात. हा निकाल अधिकृत वेबसाइटवर पीडीएफ फाइलमध्ये अपलोड केला आहे. उमेदवार ही फाइल डाउनलोड करू शकतात आणि त्यांच्या रोल नंबरनुसार निकाल तपासू शकतात.
आयबी एसीआयओ 2021 टियर -1 परीक्षेच्या निकालाची पीडीएफ लिंक येथे दिली आहे. MHA IB ACIO Result 2021 Tier -1 यावर क्लिक करून आपण ते सहजपणे तपासू शकता.
इंटेलिजेन्स ब्यूरो असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेन्स ऑफिसर ग्रेड 2 / एक्झिक्युटिव्ह (एसीआयओ -2) च्या 2000 हजार पदांसाठी आयोजित आयबी एसीआयओ 2021 टियर -1 परीक्षा 18, 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. यासाठी देशभरातील विविध शहरांमध्ये परीक्षा केंद्रे नियोजित केली गेली.
टियर -1 परीक्षेत यशस्वी घोषित झालेल्या उमेदवारांना आता टियर - 2 परीक्षेला हजेरी लावावी लागणार आहे. एमएचए आयबी एसीआयओ 2021 टियर -2 परीक्षेत वर्णनात्मक प्रश्न विचारले जातील, जे 50 गुणांचे असतील. टियर - 1 आणि टियर -2 मध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. मुलाखत 100 गुणांची असेल.
निवड प्रक्रिया
इंटेलिजेन्स ब्यूरोमध्ये असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेन्स ऑफिसर ग्रेड 2 / एक्झिक्युटिव्हच्या पदांवर उमेदवारांची नियुक्ती टियर - 1, टियर - 2 आणि मुलाखतीत प्राप्त गुणांनुसार तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल.
वेतन
निवड झालेल्या उमेदवारांना लेव्हल 7 (44,900-1,42,400 रुपये) आणि इतर भत्ते देण्यात येतील.
या भरती अधिसूचनेनुसार एसीआयओकडे 2000 रिक्त स्थान आहेत. यापैकी 989 पदे अनारक्षित आहेत. तर 113 ईडब्ल्यूएस, 417 ओबीसी, 360 एससी, 121 एसटीसाठी आरक्षित आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.