esakal | मेडिकल कोडिंगमध्ये बनवा करिअर ! आहेत बऱ्याच संधी
sakal

बोलून बातमी शोधा

Medical Coding

मेडिकल कोडिंगमध्ये बनवा करिअर ! आहेत बऱ्याच संधी

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : लाइफ सायन्स (जीवन विज्ञान) च्या विद्यार्थ्यांसाठी मेडिकल कोडिंग एक चांगला पर्याय असल्याचे सिद्ध होऊ शकते. सर्वप्रथम कोड कोडिंग म्हणजे काय, हे समजून घेणे आवश्‍यक आहे. खरं तर मेडिकल कोडिंग म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रकारच्या कोडमध्ये रुग्ण अहवाल, उपचार प्रक्रिया, वैद्यकीय सेवा आणि उपकरणे लिहिणे होय. हे वैद्यकीय बिलिंगसाठी खूप महत्त्वाचे आहे. वैद्यकीय सेवा देणाऱ्यास याच्या आधारावरच प्रतिपूर्ती मिळत असते.

मेडिकल कोडिंग व्यावसायिकांना वाढती मागणी

हेल्थ केअर आउटसोर्सिंग उद्योगाचा व्यवसाय वेगाने वाढत आहे. यासह मेडिकल कोडिंग व्यावसायिकांची मागणी देखील वाढत आहे. एका अहवालानुसार, हेल्थ केअर आउटसोर्सिंगच्या बाबतीत अमेरिकेनंतर भारत दुसऱ्या क्रमांकाचा देश म्हणून उदयास येत आहे. यामुळे वैद्यकीय कोडिंग आणि बिलिंगमधील तज्ज्ञांची नेमणूक करण्यासाठी आउटसोर्सिंग क्षेत्राची मागणी वाढत आहे.

कोर्सबद्दल...

तसे पाहता, कोणतीही पदवी मेडिकल कोडिंगमध्ये करिअर करण्यासाठी पुरेसे आहे, परंतु लाईफ सायन्सची पदवी मिळविलेल्यांना प्राधान्य दिले जाते. ज्यांना मानवी शरीर रचनाशास्त्र, मानवी शरीर क्रिया विज्ञान आणि वैद्यकीय शब्दावलीबद्दल उत्तम ज्ञान आहे त्यांना मेडिकल कोडिंग विशेषज्ञ बनण्यास अधिक सोपे आहे.

सर्टिफिकेट कोर्स

मेडिकल कोडिंगसाठी सर्टिफिकेट प्रोग्रामची आवश्‍यकता नाही, परंतु या सर्टिफिकेटमुळे नोकरी मिळण्याची शक्‍यता वाढते. मान्यताप्राप्त संस्थेकडून मेडिकल कोडिंगमध्ये सर्टिफिकेट असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाते; कारण ते योग्य कोड ओळखण्यास आणि अमलात आणण्यास अधिक सक्षम असतात. अनेक संस्था आहेत ज्या मेडिकल कोडिंगचे प्रशिक्षण व सर्टिफिकेट देतात.

कोर्सची फी...

सहसा या कोर्सची फी 20 हजार रुपयांपासून ते 30 हजार रुपयांपर्यंत असते. शुल्क एकाच वेळी द्यावे लागते. वेगवेगळ्या संस्थांची फी वेगवेगळी असते. प्रवेश घेण्यापूर्वी तुम्हाला ती माहीत असणे आवश्‍यक आहे. कमी शुल्क असणाऱ्या आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी खास शिष्यवृत्ती देणाऱ्या संस्थेत प्रवेश घ्यावा.

loading image