रेल्वेमधील अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी गुणवत्ता यादी जाहीर ! व्हेरिफिकेशन प्रक्रिया "या' दिवसापासून होणार सुरू

Railway_Recruitment.
Railway_Recruitment.
Updated on

सोलापूर : भारतीय रेल्वे, बनारस लोकोमोटिव्ह वर्क्‍समध्ये 44 व्या बेंच बीएलडब्ल्यू ऍक्‍ट अप्रेंटिस भरती 2020-21 साठी सुरू असलेल्या या भरती मोहिमेद्वारे आयटीआय आणि बिगर आयटीआयची विविध पदे भरण्यात येणार आहेत. रेल्वेने विविध पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांच्या तात्पुरत्या निकालाची गुणवत्ता पडताळणी (मेरिट लिस्ट) व रिजेक्‍ट यादी जाहीर केली आहे. पडताळणी प्रक्रिया 15 एप्रिलपासून सुरू होईल आणि 28 एप्रिल 2021 पर्यंत चालेल. 

अर्ज केलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट blw.indianrailways.gov.in वर जाऊन आपण आपला तात्पुरता निकाल तपासू शकता. 

हे जाणून घ्या, की रेल्वे अप्रेंटिस भरतीची तात्पुरती निकाल व गुणवत्ता यादी दहावीच्या उमेदवारांच्या टक्केवारीच्या आधारे तयार केली गेली आहे. 

निवडलेल्या उमेदवारांना त्यांच्या मूळ कागदपत्रांसह प्राचार्य, प्राविधि प्रशिक्षण केंद्र, बरेका वाराणसी यांच्याकडे निर्धारित तारखेला पोचवावे लागेल. प्रवेश वेळ सकाळी 10 वाजताची आहे. उमेदवारांनी कोव्हिड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्‍यक आहे. 

Railway BLW Recruitment 2021 Merit List : असे तपासा 

  • स्टेप 1 : सर्वप्रथम उमेदवार भारतीय रेल्वे बनारस लोकोमोटिव्ह वर्क्‍स blw.indianrailways.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा. 
  • स्टेप 2 : वेबसाइटवरील रिझल्ट लिंकवर क्‍लिक करा. 
  • स्टेप 3 : आता उमेदवारासमोर परीक्षा निकालाचा पीडीएफ असेल. 
  • स्टेप 4 : उमेदवार हा पीडीएफ निकाल डाउनलोड करू शकतात. 

भारतीय रेल्वे बनारस लोकोमोटिव्ह वर्क्‍समध्ये सुरू असलेल्या या भरती मोहिमेद्वारे एकूण 374 रिक्त पदे भरली जातील, ज्यात आयटीआयची 300 आणि नॉन आयटीआयची 74 पदे समाविष्ट आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com