esakal | NIT ने मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन कॉमन एन्ट्रन्स टेस्ट पुढे ढकलली ! जाणून घ्या अपडेट

बोलून बातमी शोधा

Exam
NIT ने मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन कॉमन एन्ट्रन्स टेस्ट पुढे ढकलली ! जाणून घ्या अपडेट
sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (एनआयएमसीईटी परीक्षा 2021) (NIMCET 2021 Exam) पुढे ढकलण्यात आली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (एनआयटी रायपूर), रायपूर यांनी कोव्हिड- 19 (Covid-19) संसर्गामुळे उद्‌भवलेली चिंताजनक परिस्थिती लक्षात घेत, ही परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. (NIT postpones Master of Computer Application Common Entrance Test)

एनआयटीने अधिकृत वेबसाईट nimcet.in वरही याबाबत अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार एनआयटी रायपूरने 23 मे रोजी होणारी nimcet 2021 परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन परीक्षेच्या तारखांची घोषणा अधिकृत संकेतस्थळावर नंतर होईल. सद्य:परिस्थिती लक्षात घेता उमेदवार व अधिकाऱ्यांच्या सुरक्षेच्या कारणामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

उमेदवारांनी हे ठेवावे, की विद्यार्थ्यांना परीक्षेची माहिती परीक्षेच्या 15 दिवस आधी देण्यात येईल. याशिवाय परीक्षा पुढे ढकलण्याबरोबरच परीक्षा फॉर्म भरणे, समुपदेशन, प्रवेश यासह संबंधित सर्व कामांना सध्या बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत परीक्षेला बसलेले विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अधिसूचना वाचू शकतात.

या परीक्षेव्यतिरिक्त, प्रवेश परीक्षा तसेच बोर्ड परीक्षा यासह इतर परीक्षा देशभरात स्थगित किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. सर्वप्रथम सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द करून बारावीच्या परीक्षाही पुढे ढकलल्या होत्या. देशभरात कोरोना संसर्गाची वाढती कहर लक्षात घेता हा निर्णय घेण्यात येत असल्याचे मंडळाने म्हटले होते. यानंतर भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेने (सीआयएससीई) आयसीएसई दहावी बोर्ड परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. यासह अन्य राज्यांच्या मंडळानेही याबाबत निर्णय घेतला होता. उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब, हरियाणा, राजस्थान, कर्नाटकसह इतर राज्यांसह देशाच्या विविध राज्यांनीही बोर्ड परीक्षा पुढे ढकलण्याचे ठरविले होते.

केंद्रीय अर्थसहाय्यित सर्व केंद्रीय विद्यापीठांना शिक्षण मंत्रालयाने मे महिन्यात नियोजित सर्व ऑफलाइन परीक्षा पुढे ढकलण्याचा सल्ला दिला आहे.