esakal | अर्थ मंत्रालयात सरकारी नोकरी मिळवण्याची संधी ! यंग प्रोफेशनल व कन्सल्टंट पदांसाठी करा अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

ministry of finance

अर्थ मंत्रालयातील यंग प्रोफेशनल (युवा व्यावसायिक) आणि कन्सल्टंट (सल्लागार) पदांवर भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट dea.gov.in वर अर्ज करू शकतात. 

अर्थ मंत्रालयात सरकारी नोकरी मिळवण्याची संधी ! यंग प्रोफेशनल व कन्सल्टंट पदांसाठी करा अर्ज

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : सरकारी नोकरीच्या इच्छुकांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयातील आर्थिक विषयासंबंधित विभागात (डीईए) युवा व्यावसायिक (यंग प्रोफेशनल) आणि सल्लागार (कन्सल्टंट) यांच्या एकूण 34 पदांच्या भरतीसाठी जाहिरात देण्यात आली आहे. 

मंगळवार, 6 एप्रिल 2021 रोजी विभागाने जाहीर केलेल्या भरती जाहिरातीनुसार डीईएच्या विविध विभागातील तात्पुरत्या पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवार डीईएच्या अधिकृत वेबसाइट dea.gov.in वर उपलब्ध केलेल्या mofapp.nic.in या ऍप्लिकेशन पेजवरील लिंकद्वारे अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि 20 एप्रिल रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत उमेदवार आपले अर्ज सबमिट करू शकतील. 

जाणून घ्या पात्रतेचे निकष 
यंग प्रोफेशनल पदासाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर उच्च शिक्षण संस्थांकडून अर्थशास्त्र किंवा फायनान्समध्ये मास्टर्स डिग्री किंवा एमबीए फायनान्स किंवा एलएलएममध्ये पास असावेत. तसेच उमेदवारांचे वय 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे. 

त्याच वेळी सल्लागार पदांचे उमेदवार अर्थशास्त्र किंवा फायनान्समध्ये मास्टर्स डिग्री किंवा एमबीए फायनान्स किंवा एलएलएम पास असावेत. संबंधित कामाचा किमान 3 वर्षांचा अनुभव असावा. याव्यतिरिक्त उमेदवाराचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त नसावे. 

इतका मिळेल पगार 
यंग प्रोफेशन्सच्या पदांसाठी नियुक्त केलेल्या उमेदवारांना दरमहा वेतन 40 हजार रुपये आणि सल्लागारासाठी दरमहा 80 हजार रुपये देण्यात येणार आहे. 

loading image