esakal | "BHEL'मधील ऍप्रेंटिसच्या विविध पदांसाठी भरती ! जाणून घ्या या सरकारी नोकरीसाठीची पदे व शैक्षणिक पात्रता
sakal

बोलून बातमी शोधा

Jobs_BHEL

"बीएचईएल'मधील ऍप्रेंटिसच्या बऱ्याच विविध पदांवर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. दहावी पास (आयटीआय) पासून ते इंजिनिअरिंग, डिप्लोमा आणि बीई - बीटेक केलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी आहे. 

"BHEL'मधील ऍप्रेंटिसच्या विविध पदांसाठी भरती ! जाणून घ्या या सरकारी नोकरीसाठीची पदे व शैक्षणिक पात्रता

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : भारत हेवी इलेक्‍ट्रिकल्स लिमिटेड (बीएचईएल) कडून ऍप्रेंटिसच्या अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. दहावीनंतर आयटीआय लेव्हल जॉब्स, इंजिनिअरिंग, डिप्लोमा, बीई आणि बीटेक करणाऱ्यांसाठी शासकीय नोकरी मिळण्याची शक्‍यता आहे. या नोकर भरतीसाठी कोणतीही परीक्षा होणार नाही. जाणून घ्या या सरकारी नोकरीचा तपशील... 

कोणती पदे आहेत रिक्त? 

 • ट्रेड ऍप्रेंटिस : 253 पदे 
 • टेक्‍निशियन ऍप्रेंटिस : 70 पदे 
 • ग्रॅज्युएट ऍप्रेंटिस : 66 पदे 
 • एकूण : 389 पदे 

पात्रता काय आहेत? 

 • ट्रेड ऍप्रेंटिस : उमेदवार हा दहावीनंतर एससीव्हीटी किंवा एनसीव्हीटी या मान्यताप्राप्त संस्थेकडून व्हॅकेन्सी संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय कोर्स केलेला असावा. 
 • टेक्‍निशियन ऍप्रेंटिस : उमेदवार हा व्हॅकेन्सी संबंधित शाखेत इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेला असावा. 
 • ग्रॅज्युएट ऍप्रेंटिस : उमेदवार हा व्हॅकेन्सी संबंधित शाखेत बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग (बीई) किंवा बॅचलर ऑफ टेक्‍नॉलॉजी (बीटेक) केलेला असावा. 

वयोमर्यादा काय आहे? 
सर्व पदांसाठी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 27 वर्षे असावे. 10 एप्रिल 2021 पर्यंत वयाची गणना केली जाईल. आरक्षित वर्गांना जास्तीत जास्त वयोमर्यादेमध्ये सवलतीचा लाभ मिळेल. 

कसे आणि केव्हा अर्ज करावे? 
आपल्याला बीएचईएल तिरुचिरापल्ली (BHEL Trichy) ची वेबसाइट trichy.bhel.com वर ऑनलाइन अर्ज करावा लागेल. परंतु त्यापूर्वी उमेदवारांना नॅशनल ऍप्रेंटिसशिप पोर्टलवर (National Apprenticeship Portal) नोंदणी करावी लागेल. 

 • अर्ज प्रारंभ तारीख : 1 एप्रिल 2021 
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख : 14 एप्रिल 2021 
 • अर्जाच्या आधारे शॉर्टलिस्टेड उमेदवारांची यादी तारीख : 16 एप्रिल 2021 
 • कागदपत्रे पडताळणीची तारीख : 21 एप्रिल 2021 

निवड कशी होईल? 
बीएचईल त्रिची या पदांवरील नोकरीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. गुणवत्तेच्या आधारे थेट भरती होईल.

loading image