
ATMA 2021 मे सेशनसाठी रजिस्ट्रेशन सुरू ! "ही' आहे शेवटची तारीख
सोलापूर : असोसिएशन ऑफ इंडियन मॅनेजमेंट स्कूल (AIMS) च्या मे सेशनसाठी एआयएमएस टेस्ट फॉर मॅनेजमेंट ऍडमिशन (ATMA 2021) अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी 26 एप्रिलपासून सुरू झाली आहे. नोंदणीची अंतिम तारीख 23 मे 2021 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार atmaaims.com वर भेट देऊन ऑनलाईन नोंदणी करू शकतात.
ऑनलाइन नोंदणीसाठी अधिकृत वेबसाइटवर एक लिंक उपलब्ध आहे. नोंदणी करण्यापूर्वी उमेदवारांनी पात्रतेचे निकष तपासले पाहिजेत. मेच्या सत्रासाठी एआयएमएस टेस्ट फॉर मॅनेजमेंट ऍडमिशन (एटीएमए 2021) 30 मे 2021 रोजी होणार आहे. होम बेस्ड ऑनलाइन मोडमध्ये परीक्षा दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत एका शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे.
या आहेत महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन नोंदणीसाठी प्रारंभ तारीख : 26 एप्रिल 2021
फी भरण्याची शेवटची तारीख : 22 मे 2021
ऑनलाइन नोंदणीसाठी अंतिम तारीख : 23 मे 2021
अर्ज फॉर्मची प्रिंट काढण्याची अंतिम तारीख : 25 मे 2021
प्रवेशपत्र देण्याची तारीख : 26 मे 2021
परीक्षेची तारीख : 30 मे 2021
निकाल जाहीर तारीख : 5 जून 2021
असे करा ऑनलाइन रजिस्ट्रेशन
ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट atmaaims.com वर भेट द्यावी. यानंतर मेन पेजवरील उपलब्ध इम्पॉर्टंट डेट्स सेक्शनमध्ये एटीएमए परीक्षा लिंकवर नोंदणी करण्यासाठी क्लिक करा. आता एक नवीन टॅब उघडेल. माहिती, नाव, जन्मतारीख, शहर, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी टाका आणि ऑनलाइन फी भरा. यानंतर आपण पुढील अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता. अर्जाशी संबंधित सूचनाही वेबसाइटवर जारी केल्या गेल्या आहेत.
Web Title: Solapur Registration For The Atma May Session Has
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..