सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केले विविध कोर्सेसचे निकाल जाहीर ! "या' थेट लिंकवरून चेक करा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केले विविध कोर्सेसचे निकाल जाहीर
Pune University
Pune UniversityEsakal

सोलापूर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (एसपीपीयू)ने (Savitribai Phule Pune University, SPPU) विविध कोर्सेसच्या परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. त्या अनुषंगाने फॉरेन्सिक आणि मेडिकल ज्यूरिस्प्रुडन्स आणि युनिव्हर्सिटी सर्टिफिकेट कोर्स इन सायबर लॉज (Certificate Course in Forensic and Medical Jurisprudence and Diploma Course in Cyber Laws), डिप्लोमा इन टॅक्‍सेशन लॉ (diploma in taxation law) यासह युनिव्हर्सिटी सर्टिफिकेट कोर्ससह इतर परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. उमेदवार अधिकृत वेबसाइट results.unipune.ac.in वर निकाल तपासू शकतात. याशिवाय खाली दिलेल्या निकाल तपासण्याच्या टप्प्यांचे अनुसरण करूनदेखील निकाल पाहू शकता. (Savitribai Phule Pune University announces results of various courses)

Pune University
"आयसीएसआय'ने दिली कंपनी सेक्रेटरी जून परीक्षांसाठी पुन्हा संधी ! जाणून घ्या सविस्तर

याप्रमाणे तपासा निकाल

फॉरेन्सिक अँड मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स इन सर्टिफिकेट कोर्स आणि सायबर लॉजमध्ये डिप्लोमा कोर्स यासह विविध परीक्षांचा निकाल तपासण्यासाठी उमेदवारांनी प्रथम विद्यापीठाची वेबसाइट unipune.ac.in वर भेट द्यावी. त्यानंतर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्‍लिक करा. तसेच सीट नंबर क्रमांक आणि आईच्या नावासह लॉगइन करा. यानंतर एसपीपीयू परीक्षेचा निकाल सबमिट करा आणि ऍक्‍सेस करा. यानंतर एसपीपीयू निकालाचे प्रिंटआउट घेऊन भविष्यासाठी ठेवू शकता.

Pune University
मेडिकल ऑफिसर पदांसाठी "सीआरपीएफ'मध्ये भरती ! 17 मे रोजी होणार इंटरव्ह्यू

एसपीपीयूने इतर अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. डिप्लोमा इन टॅक्‍सेशन लॉ, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेल्फेअर, डिप्लोमा कोर्स इन सायबर लॉज यांचा समावेश आहे. या सेमिस्टर परीक्षा ऑक्‍टोबर 2020 मध्ये घेण्यात आल्या.

विद्यापीठाने स्कोअर कार्डच्या रूपात निकाल जाहीर केला आहे. स्कोअर कार्डमध्ये वैयक्तिक माहिती तसेच त्यांचे गुण जाहीर केले आहेत. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उमेदवारांविषयी अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट pune.ac.in वर अपडेट तपासू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com