esakal | "सीए फाउंडेशन जून परीक्षा'साठी नोंदणी प्रक्रिया सुरू ! "येथे' करा अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

Exam

"सीए फाउंडेशन जून परीक्षा'साठी नोंदणी प्रक्रिया सुरू ! "येथे' करा अर्ज

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटट्‌स ऑफ इंडिया (आयसीएआय) ने सीए फाउंडेशन जून परीक्षा 2021 साठी नोंदणी प्रक्रिया 20 एप्रिलपासून सुरू केली आहे. ज्या उमेदवारांना फाउंडेशन कोर्स परीक्षेसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी आयसीएआयच्या अधिकृत वेबसाईट icaiexam.icai.org वर ऑनलाइन अर्ज दाखल करावा. ऑनलाइन फॉर्म जमा करण्याची शेवटची तारीख 4 मे 2021 पर्यंत आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडियाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सीए फाउंडेशन परीक्षेसाठी उशिरा शुल्कासह ऑनलाइन फॉर्म जमा करण्याची अंतिम तारीख 7 मे 2021 आहे. सीए फाउंडेशन 1 च्या परीक्षा 24 जून 2021 रोजी सुरू होतील आणि 30 जून 2021 रोजी संपतील. पेपर 1 ची परीक्षा दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत घेण्यात येणार आहे. याशिवाय पेपर 3 व 4 च्या परीक्षा दुपारी 2 ते सायंकाळी 4 या वेळेत होतील.

असा करा अर्ज

सीए फाउंडेशन जून परीक्षेसाठी उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाईट icaiexam.icai.org वर जाणे आवश्‍यक आहे. यानंतर मेन पेजवरील लॉग इन / रजिस्टर' टॅबवर क्‍लिक करा. नोंदणी करण्यासाठी आवश्‍यक तपशिलामध्ये तपशील प्रविष्ट करा. नंतर आपला नोंदणीकृत आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा. यानंतर अर्ज फी भरा आणि सीए फाउंडेशन परीक्षा फॉर्म सबमिट करा. फॉर्मचे प्रिंटआउट घ्या आणि भविष्यासाठी ठेवा.

उमेदवारांनी नोंद घ्यावी, की भारतीय उमेदवारांसाठी अर्ज फी 1500 असेल. यूएस उमेदवारांना परदेशी केंद्रांसाठी 325 डॉलर द्यावे लागतील. याशिवाय उमेदवारांना काटमांडू (नेपाळ) केंद्रांमध्ये 2200 रुपये फी भरावी लागेल. यासह 600 रुपये उशिरा फी भरावी लागेल. या व्यतिरिक्त सीए फाउंडेशन जून परीक्षेसंदर्भात अधिक माहितीसाठी आपल्याला अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

loading image