esakal | "या' सरकारी विभागात आहेत ग्रॅज्युएट व पीजीसाठी सरकारी नोकऱ्यांची संधी !

बोलून बातमी शोधा

jOBS

पदवीधर आणि पदव्युत्तर झालेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होत आहे. स्वच्छ भारत मिशन - ग्रामीण आणि पाणी जीवन अभियान राबविण्याकरिता कर्नाटकच्या ग्रामीण पेयजल व स्वच्छता विभाग (आरडीपीआर) ने विविध पदांवर भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे. 

"या' सरकारी विभागात आहेत ग्रॅज्युएट व पीजीसाठी सरकारी नोकऱ्यांची संधी !
sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : पदवीधर आणि पदव्युत्तर झालेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होत आहे. स्वच्छ भारत मिशन - ग्रामीण आणि पाणी जीवन अभियान राबविण्याकरिता कर्नाटकच्या ग्रामीण पेयजल व स्वच्छता विभाग (आरडीपीआर) ने विविध पदांवर भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे. इच्छुक उमेदवार 5 एप्रिल रोजी rdpr.karnaka.gov.in या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या संकेतस्थळावर दिलेल्या भरती अधिसूचनेनुसार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 एप्रिल 2021 निश्‍चित करण्यात आली आहे. 

अर्ज कसा करावा? 
उमेदवार भरती अधिसूचना व अर्जाचा फॉर्म आरडीपीआरच्या वेबसाइटवरील भरती विभागात दिलेल्या लिंकवर किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवरून डाउनलोड करू शकतात. शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या पत्त्यावर विनंती केलेल्या कागदपत्रांसह पूर्ण अर्ज सबमिट करा. पत्ता : आयुक्त, ग्रामीण पेयजल व स्वच्छता विभाग, दुसरा मजला, केएचबी कॉम्प्लेक्‍स, कावेरी भवन, केजी रोड, बंगळूर - 560000 (कर्नाटक). 

या लिंकवरून करा अधिसूचना आणि अर्ज डाउनलोड :
https://rdpr.karnataka.gov.in/ 

पात्रतेचे निकष... 
ग्रामीण पेयजल आणि स्वच्छता विभाग (आरडीपीआर) भरती 2021 च्या अधिसूचनेनुसार, पात्रतेचे निकष पोस्ट्‌सनुसार बदलतात. तथापि, बहुतेक पदांसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्था किंवा पीजी किंवा एमसीए किंवा एमटेक किंवा एमएस्सी किंवा बीईमधून पदवीधर असायला पाहिजे. 

वेतन... 
पात्रता निकष तसेच पदांनुसार वेतन देखील निश्‍चित केले जाते. तथापि, 15 हजार दरमहा ते 1.5 लाख रुपयांपर्यंत प्रतिमहिना वेतन आहे.