esakal | लाइट्‌स, कॅमेरा, ऍक्‍शन..! अभिनय क्षेत्रात आहेत उत्तम करिअरच्या अनेक संधी

बोलून बातमी शोधा

लाइट्‌स, कॅमेरा, ऍक्‍शन..! अभिनय क्षेत्रात आहेत उत्तम करिअरच्या अनेक संधी

ऍमेझॉन प्राइम, एमएक्‍स प्लेअर, हॉट स्टार, सोनी लाइव्ह, ओपन प्लॅटफॉर्म यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे लोकांना नवीन करमणुकीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. यासह अभिनयाच्या क्षेत्रातील कलाकारांसह या क्षेत्रातील अन्य कौशल्यांच्या कलावंतांसाठी उत्तम संधी निर्माण झाल्या आहेत. 

लाइट्‌स, कॅमेरा, ऍक्‍शन..! अभिनय क्षेत्रात आहेत उत्तम करिअरच्या अनेक संधी
sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : जर तुमच्याकडे कौशल्य असेल तर तुम्ही अभिनय क्षेत्रातही चांगले करिअर बनवू शकता. एक काळ असा होता, की फक्त चित्रपटांत अभिनय करण्याची संधी होती. किंवा लोकांना थिएटरमध्ये काही काम मिळायचे. पण आता अशी परिस्थिती नाही. एखादी प्रशिक्षित व्यक्ती अभिनयाच्या क्षेत्रात अधिक यशस्वी होऊ शकते. ऍमेझॉन प्राइम, एमएक्‍स प्लेअर, हॉट स्टार, सोनी लाइव्ह, ओपन प्लॅटफॉर्म यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे लोकांना नवीन करमणुकीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. यासह अभिनयाच्या क्षेत्रातील कलाकारांसह या क्षेत्रातील अन्य कौशल्यांच्या कलावंतांसाठी उत्तम संधी निर्माण झाल्या आहेत. 

एनआरएआय स्कूल ऑफ मास कम्युनिकेशनचे दिग्दर्शक आणि अभिनेते नलिन रंजन सिंह म्हणतात, अभिनयाच्या जगाची चमक सर्वांना आकर्षित करते. परंतु येथे तोच टिकतो ज्याच्यामध्ये काहीतरी करण्याची आवड आहे. या सर्वांसह योग्य संस्थेकडून घेतलेले प्रशिक्षण खूप उपयुक्त आहे, जे अभिनयातील बारकावे सांगते. आज पैसा, ग्लॅमर आणि प्रसिद्धी या सर्व गोष्टी अभिनयाच्या क्षेत्रात आहेत. आजच्या काळात टीव्ही आणि चित्रपट उद्योग हा भारतातील वेगाने वाढणारा उद्योग मानला जात आहे. त्यात करिअर करण्यासाठी बरेच पर्याय आहेत. अभिनयासाठी डिप्लोमा आणि पदवी अभ्यासक्रम आहेत हे देखील आपणास माहीत असणे आवश्‍यक आहे. बऱ्याच सरकारी आणि खासगी संस्थांमधून हा कोर्स उपलब्ध आहे. 

अभ्यासक्रम व शैक्षणिक पात्रता 
पीजी डिप्लोमा इन ऍक्‍टिंगचा दोन वर्षांचा कोर्स, ऍक्‍टिंगमध्ये डिप्लोमाचा तीन वर्षांचा कोर्स, सिनेमा पदव्युत्तर पदविका तीन वर्षांचा अभ्यासक्रम आणि फास्ट ट्रॅक ऍक्‍टिंग कोर्स जो सहा महिन्यांचा असतो. बारावीनंतर अभिनय क्षेत्रात करिअर घडवता येते. सर्टिफिकेट कोर्स इन ऍक्‍टिंग सहा महिने अभ्यासक्रम, डिप्लोमा इन परफॉर्मिंग आर्टस, बॅचलर इन परफॉर्मिंग असे अभ्यासक्रमही करता येतात. अनेक संस्था दहावीनंतरही अभिनय अभ्यासक्रम शिकवतात. पदवीनंतर ऍक्‍टिंगमधील पीजी डिप्लोमा, ऍक्‍टिंग पीजी सर्टिफिकेट कोर्स या क्षेत्रातील करिअरची दारेही उघडतात. नावाजलेल्या व प्रसिद्ध संस्थांमध्ये तीन सहा महिन्यांच्या प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा कोर्ससाठी फी साधारणतः 50 हजार ते एक लाख रुपये आहे. अशा परिस्थितीत सरकारी संस्थांमध्ये अत्यल्प फी आकारली जाते. 

कुठे आहेत संधी? 
तंत्रज्ञानाच्या विकासाने अभिनयाचे जग खुल्या आकाशाखाली ठेवले आहे. करमणुकीचे क्षेत्र यापुढे केवळ चित्रपट किंवा नाटकांपुरते मर्यादित राहिले नाही. आता लघुपट, जाहिराती, क्राईम प्रोग्रामसह स्थानिक भाषांमधील अनेक प्रकारच्या कथा देखील यू-ट्यूबच्या माध्यमातून लोकांसमोर आणल्या जात आहेत. 

कोर्स कोठे करावा? 
आजकाल बऱ्याच संस्था अभिनय विषयात डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम देत आहेत. कोणत्याही संस्थेत ऍक्‍टिंग कोर्समध्ये प्रवेश घेण्यापूर्वी त्या संस्थेबद्दल चांगली माहिती घ्यावी. चांगल्या आणि नामांकित संस्थेतून अभिनय अभ्यासक्रम करा, अन्यथा तुम्हाला नंतर त्याबद्दल पश्‍चात्ताप होऊ शकेल. अभिनयात पदविका किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम खालील संस्थांकडून देखील करता येतो. 

एनआरएआय स्कूल ऑफ मास कम्युनिकेशन 
http://www.nraismc.com/ 

फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे 
https://www.ftii.ac.in/ 

सत्यजित रे फिल्म संस्था, सोलापूर : 
http://srfti.ac.in/