esakal | सहाय्यक कमांडंट भरती परीक्षेसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस ! त्वरा करा

बोलून बातमी शोधा

Assi. Commandant
सहाय्यक कमांडंट भरती परीक्षेसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस ! त्वरा करा
sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) (UPSC CAPF Application 2021) 15 एप्रिल रोजी केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सहाय्यक कमांडंट) परीक्षा 2021 साठी अधिसूचना जारी करून अर्ज मागविले आहेत. त्याच दिवशी अधिकृत वेबसाइटवर अर्ज प्रक्रिया सुरू केली गेली. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मे 2021 (संध्याकाळी 6 वाजेपर्यंत) आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी त्वरित upsconline.nic.in वर जाऊन अर्ज करावा. (Today is the last day to apply for the Assistant Commandant Recruitment Examination)

या भरती परीक्षेच्या माध्यमातून केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPFs) जसे- सीमा सुरक्षा बल (BSF), केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), इंडो-तिबेट सीमा पोलिस (ITBP) आणि सशस्त्र सीमा बल (SSB) सहाय्यक कमांडंटची एकूण 159 पदे रिक्त आहेत. यासाठी लेखी परीक्षा 8 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात येणार आहे.

जाणून घ्या पात्रतेचे निकष...

या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेत पदवीधर असणे आवश्‍यक आहे. याशिवाय उमेदवाराचे वय 20 ते 25 वर्षे निश्‍चित केले आहे. म्हणजेच, 2 ऑगस्ट 1996 पूर्वी आणि 1 ऑगस्ट 2001 नंतर उमेदवाराचा जन्म असू नये. पात्रतेच्या निकषांबद्दल अधिक माहितीसाठी आपण अधिकृत वेबसाइट upsc.gov.in येथे भेट देऊन अधिसूचना तपासू शकता.

अशी होईल निवड...

उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक कार्यक्षमता चाचणी (पीईटी), शारीरिक मानक चाचणी (पीएसटी), वैद्यकीय चाचणी व मुलाखत / व्यक्तिमत्त्व चाचणीद्वारे केली जाईल. तपशीलवार माहितीसाठी आपण सूचना तपासू शकता.

असे करा ऑनलाइन अर्ज

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट, upsconline.nic.in वर भेट द्या. यानंतर मुख्य पेजवर उपलब्ध युनियन लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांच्या ऑनलाइन अर्ज लिंकवर क्‍लिक करा. आता एक नवीन टॅब उघडेल. येथे आपण संबंधित परीक्षेसाठी दिलेल्या नोंदणी लिंकद्वारे अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यास सक्षम असाल.