

Young professionals exploring emerging career opportunities in India's expanding maritime, underwater technology and blue economy sectors.
Sakal
डॉ. (कमांडर) अर्नब दास, माजी नौदल अधिकारी
भारत ‘महासागर व्हिजन’अंतर्गत सागरी सुरक्षा, तंत्रज्ञान, स्टार्टअप्स आणि नील अर्थव्यवस्थेवर अधिक भर देत असताना, पाण्याखालील क्षेत्रातील रोजगार, नवकल्पना आणि आर्थिक विकासाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येत आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील झपाट्याने विस्तारत असलेल्या अंडरवॉटर डोमेन अर्थात पाण्याखालील व नील अर्थव्यवस्था क्षेत्रात २०३०पर्यंत आणि त्यानंतर तरुणांसाठी लाखो रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, पाण्याखालील डेटा विश्लेषण, हवामान बदल, मत्स्यपालन, गोड्या पाण्याचे व्यवस्थापन, गाळ व्यवस्थापन, शहरी पूर व्यवस्थापन आणि सागरी पायाभूत सुविधा यांसारख्या नव्या क्षेत्रांमुळे करिअरच्या अनेक नव्या वाटा तरुण पिढीसाठी खुल्या होत आहेत.